शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime: वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकाचा खून, कोयत्याने सपासप वार; हल्लेखोर पसार

By संजय पाटील | Updated: November 27, 2022 15:38 IST

Crime: कऱ्हाड - मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आला. कºहाड तालुक्यातील जुळेवाडी गावात शनिवारी रात्री ही घटना घडली.

- संजय पाटील

कऱ्हाड - मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात युवकावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आला. कºहाड तालुक्यातील जुळेवाडी गावात शनिवारी रात्री ही घटना घडली. राजवर्धन महादेव पाटील (वय २४, रा. जुळेवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर हल्लेखोर पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळेवाडी येथील एका युवकाचा शनिवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त रात्री केक कापण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. गावातील चौकातच त्यासाठी युवक जमले होते. राजवर्धन हासुद्धा त्याठिकाणी गेला. राजवर्धनच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या चौकातच हा कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरू असताना गावातीलच एका युवकाने राजवर्धन याच्यावर धारदार कोयत्याने दहा ते पंधरा वार केले.

अचानक घडलेल्या या घटनेने युवकांची धावपळ उडाली. वार केल्यानंतर राजवर्धनला रक्तबंबाळ स्थितीत सोडून आरोपी तेथून पसार झाला. तर राजवर्धन त्याही परिस्थितीत चालत घरापर्यंत गेला. कुटूंबिय व ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात हलवले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच हल्लेखोर युवकाचाही पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर