शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय टोळीतील 10 दरोडेखोरांवर मोक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 21:28 IST

कल्याण पोलिसांची कारवाई 

ठळक मुद्देया 10 अट्टल दरोडेखोरांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे .अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने सदर टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे चोरटे आंध्र प्रदेश व चेन्नई राज्यातील राहणारी आहे.

कल्याण - कल्याण परिमंडळ च्या अँटी रॉबरी पथकाने जून महिन्यात बँकेवर दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 9 जणांसह त्यांच्या फरार म्होरक्याला गजाआड केले होते. या टोळीकडून महारष्ट्रासह कर्नाटक राज्यात एकूण 35 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून अद्याप महात्मा फुले, मानपाडा, कोलशेवाडी, नारपोली, निजामपुरा या पोलीस स्थानकाच्या हद्दीतील 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. या 10 अट्टल दरोडेखोरांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 24 जून रोजी पेट्रोलिंग दरम्यान कल्याण परिमंडळ 3 च्या अँटी रॉबरी पथकाने मुरबाड रोडवर पेट्रोलिंग करीत असताना याच परिसरातील एक बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासह 10 जणांच्या टोळीला गजाआड केले होते. या अटक दरोडेखोरांच्या तपासात महात्मा फुले पोलीस स्थानकात 9, मानपाडा 3 तर कोलसेवाडी, नारपोली, निजमपुरा प्रत्येकी 1 गुन्ह्यांचा उलगडा झाला. पोलिसांनी या टोळीकडून सुमारे साडे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही टोळी आंतरराज्यीय असून महाराष्ट्रातील कल्याण ,भिवंडी, मानपाडा, चाळीसगाव,औरंगाबाद,आदी शहरासह कर्नाटक मधील सिंदगी आदी ठिकाणी 35 गुन्हे दाखल असून हे चोरटे आंध्र प्रदेश व चेन्नई राज्यातील राहणारी आहे. अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने सदर टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.मोक्काअंतर्गत आरोपींची नावेइलियाराज राजशेखर(30),संजय नायडू (25), बेंजीमन इरगदिनल्ला (26), दासू येड्डा (28), सालोमन गोगुला (29), अरुण कुमार पेटला (24), राजन गोगुल (46),मोशा याकूब (30), डॅनियल अकुला (25), चिनना गोगुला या दहा दरोडेखोरांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :MCOCA ACTमकोका कायदाDacoityदरोडाArrestअटकkalyanकल्याणPoliceपोलिस