शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा, प्रकाश सुर्वे यांच्या बॅनरवरून राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 06:24 IST

पहिला गुन्हा भाजपच्या बिभीषण वारे (४०) यांच्या तक्रारीवरुन १९ मार्च रोजी नोंदवण्यात आला आहे.

मुंबई : दहिसर अशोकवन येथे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या बॅनरवरून शिंदे गट - भाजपच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गैर कायद्याची मंडळी जमवून दुखापत केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहेत. पहिला गुन्हा भाजपच्या बिभीषण वारे (४०) यांच्या तक्रारीवरुन १९ मार्च रोजी नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार, शिंदे गटातील सुनील श्रीहरी मांडवे (४३), अनिल महादेव दबडे (४२), रामेश्वर प्रदीप राठोड (२०), राहुल रमेश कागदुले (२३) व विजय गजानन यादव (४३) यांना अटक करण्यात आली. 

हे पाचही जण बोरिवलीतील रहिवासी आहेत.  आशिष नायर, नीतेश उत्तेकर ऊर्फ बंटी, सोनू पालडे, मयूर वाघेलाचा शोध सुरू आहे.  वारे यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री अटक आरोपींनी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमाचे बॅनर काढून नवनाथ नावाडकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याने अभिनंदनाचा बॅनर लावल्याच्या रागात वाद घालून हाणामारी  केली.  वारे यांच्या डोक्याला  दुखापत करून डाव्या हाताच्या कॉलर बोनला फॅक्चर केले. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदविला..दुसरा गुन्हा शिंदे गटातील आशिष शशी नायर (३५) यांच्या तक्रारीवरून बिभीषण वारे,  नवनाथ नावाडकर,  बेचैन पांडे, सचिन भालेराव, अनिल गिंबल, अजिंक्य,  सूरज,  शंकर यांसह अन्य ८ जणांविरोधात गुन्हा नोंदविला.

शुभेच्छांचा बॅनर लावल्याचा रागशिंदे गटाचे आशिष नायर यांच्यावर कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, प्रकाश सुर्वे यांच्या पक्षाचे डिजिटल बॅनर काढून बिभीषण वारे यांनी भाजपच्या नवनाथ नावाडकर यांनी पक्ष प्रवेश केलेला बॅनर लावला. तो बॅनर काढून प्रकाश सुर्वे यांचा गुढीपाडवा शुभेच्छा असलेला बॅनर लावल्याच्या रागात वारे यांनी लाकडी बांबूने, नवनाथ नावाडकर यांनी लोखंडी रॉडने, अनिल गिंबलने चॉपरने, शंकर व सचिन यांनी दारूच्या बाटलीने त्यांच्यासह त्यांच्या मित्रांना मारहाण केली. डोक्यात रॉड लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी