शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

१५ लाखाच्या फसवणूक प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:16 PM

खामगाव: अंडर ग्रांऊड केबल टाकण्याची मशीन खरेदीसाठीची रक्कम संबंधितांच्या बँकेत भरल्यानंतरही मशीन न पाठविता, अदा केलेली रक्कम टाळाटाळ करीत असलेल्या चौघांविरोधात शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देभूमिगत केबल टाकण्यासाठी उपयोगात येणाºया मशीन बाबत विचारणा केली. ४७ लाख ४९ हजार रुपये संबंधित मशीनचे कोटेशन ठरले.२३ लाख ९७ हजार वर्ड वाईड कंपनीच्या एचडीएफसी बँकेतील खात्यात जमा केले. मात्र, या कंपनीकडून कोणतीही मशीन पाठविण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: अंडर ग्रांऊड केबल टाकण्याची मशीन खरेदीसाठीची रक्कम संबंधितांच्या बँकेत भरल्यानंतरही मशीन न पाठविता, अदा केलेली रक्कम टाळाटाळ करीत असलेल्या चौघांविरोधात शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. एटीएम अपहार प्रकरणाची शाई वाळते ना वाळते तोच, शहरात आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.  खामगाव शहरातील कोल्हटकर स्मारक मंदिरानजीक राहणाºया आकाश विठ्ठल सातपुतळे (३६) यांनी वर्ड वाईड मशिनरीज् सोल्युशन मुंबई यांच्याशी भूमिगत केबल टाकण्यासाठी उपयोगात येणाºया मशीन बाबत विचारणा केली.  त्यानंतर  कंपनीचे व्यवस्थापक नवनीत माथूर, तारीक सलमान, प्रदीप जैन, चैतन्य वैद्य यांच्याशी संपर्क केला असता ४७ लाख ४९ हजार रुपये संबंधित मशीनचे कोटेशन ठरले. सौदा पक्का झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे ही मशीन खरेदी करण्यासाठी सातपुतळे यांनी  १५ फेब्रुवारी २०१७ ते २० जून २०१७ या कालावधीत सातपुतळे यांनी २३ लाख ९७ हजार वर्ड वाईड कंपनीच्या एचडीएफसी बँकेतील खात्यात जमा केले. मात्र, या कंपनीकडून कोणतीही मशीन पाठविण्यात आली नाही. त्यामुळे पैसे परत करण्यासाठी सातपुतळे यांनी तगादा लावला असता, संबंधीतांनी ९ लाख रूपये परत केले. उर्वरीत १४ लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यासाठी सातपुतळे यांनी बरेच प्रयत्न केले. वारंवार संपर्कही केला. मात्र, संबंधितांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे सातपुतळे यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांसह चौघांविरोधात खामगाव शहर पोलिस स्टेशनला मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली. यातक्रारीवरून शहर पोलिसांनी वर्ल्ड वाईड मशीनरीज सोल्युशन मुंबईच्या व्यवस्थापकांसह उपरोक्त चौघांविरोधात कलम ४२०, ४०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :khamgaonखामगावfraudधोकेबाजी