शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चुलतभावाची चाकूने भोसकून हत्या; तिघांवर खुनाचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 18:25 IST

Murder Case : चिंचफैल येथील एका मुलीशी प्रेमसंबंध जुळविले आणि तो नाशिकला राहायला गेला.

ठळक मुद्देपोलिसांनी घटनास्थळावर जाऊन रक्तबांबाळ अवस्थेत पडलेल्या कैलासला तात्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले.

अमरावती : क्षुल्लक कारणावरून चाकूने भोसकून चुलतभावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी हमालपुऱ्यात घडली. कैलास मोहन अजबे (३८,रा. चिचफैल) असे मृताचे नाव आहे. या खून प्रकरणात राजापेठ पोलिसांनी आरोपी सुनील माणिक अजबे (४५, रा. हमलापुरा), त्याची पत्नी व आईला अटक केली आहे.पोलीस सूत्रांनुसार, कैलास व सुनील हे एकमेकांचे चुलतभाऊ आहेत. कैलासचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले. परंतु, त्याला अपत्य नव्हती. त्याचा चुलतभाऊ सुनील अजबे याची पत्नी सोडून गेली होती. त्यामुळे त्याने चिंचफैल येथील एका मुलीशी प्रेमसंबंध जुळविले आणि तो नाशिकला राहायला गेला.

काही महिन्यांपूर्वी तो हमालपुरा येथे परतला. १३ फेब्रुवारी रात्री कैलास हा सुनीलच्या घरी गेला. घरात आणलेल्या मुुलीबद्दल विचारणा करून, तिला सोबत ठेवू नको, समाजात बदनामी होत आहे, असे कैलासने सुनीलला म्हटले. नेमकी हीच बाब सुनीलला खटकली. त्याने कैलासला अपत्य नसल्याबाबत हिणवले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद शांत झाल्यानंतर कैलास घरी परत गेला. मात्र, रविवारी सकाळीच कैलास हा सुनीलच्या घरी गेला. बदनामी करीत असल्याचे म्हणत त्याच्याशी वाद घातला. त्यामुळे संतापलेल्या सुनीलने कैलासवर चाकुहल्ला चढविला. कैलासच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. दोघांचा वाद बघून सुनीलच्या आईनेसुद्धा कैलासच्या डोक्यावर बत्ता मारला तसेच पत्नी असलेल्या सदर मुलीने रपट्याने मारहाण केली. बत्त्याचा घाव वर्मी लागल्याने कैलास गांगरला. त्याचवळी सुनीलने छातीत चाकू भोसकला. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनास्थळाला पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, ठाणेदार मनीष ठाकरे यांनी भेट दिली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. 

तिघांना अटकपोलिसांनी या घटनेनंतर तीनही आरोपींना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन रक्तबांबाळ अवस्थेत पडलेल्या कैलासला तात्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले. झटापटीत सुनीलच्या डोक्यालासुद्धा जखमा झाल्याने त्यालाही दवाखान्यात नेले. याप्रकरणी सुनील अजबे, त्याची पत्नी व आईला पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :MurderखूनAmravatiअमरावतीPoliceपोलिस