शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने फेटाळला कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा जामीन; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 08:25 IST

२०१५ मध्ये राजनचे विदेशातून भारतात प्रत्यार्पण करण्यात आल्यापासून त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शस्त्रसाठा प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाने कुख्यात गँगस्टर छोटा राजनला जामीन नाकारला आहे. दरम्यान, राजन सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात बंदिस्त आहे. छोटा राजनच्या टोळीतील भरत नेपाळीने मागवलेला पिस्तुल, रिव्हॉल्वर, काडतुसे, सायलन्सर, असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणात राजनविरोधात सीमाशुल्क, भादंवि, शस्त्रास्त्र कायदा व मोक्का कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यामध्ये साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आल्या असून, खटला लवकरच संपण्याची शक्यता आहे, त्यामुळे जामीन मंजूर करता येणार नाही, असे स्पष्ट करत मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी छोटा राजनला जामीन देण्यास नकार दिला. २०१५ मध्ये राजनचे विदेशातून भारतात प्रत्यार्पण करण्यात आल्यापासून त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्याविरोधात दाखल असलेल्या विविध खटल्यांची सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयात खटल्यांच्या सुनावणीवेळी त्याला सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले जाते.

सरकारी वकिलांचा विरोध

२०१५ मध्ये प्रत्यार्पण झाल्यापासून तुरुंगात असल्याने याप्रकरणी जामीन मिळावा, अशी मागणी राजनने याचिकेद्वारे केली होती. मात्र, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी त्याच्या मागणीला विरोध केला. याप्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनCourtन्यायालय