शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 14:56 IST

10 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत आरोपींना आता मिळाली शिक्षा.

कोप्पल : कर्नाटकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दलित समाजाच्या वस्तीला आग लावल्याप्रकरणी कोप्पल जिल्हा न्यायालयाने 101 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींना अलीकडेच न्यायालयाने दोषी ठरवले होते, तर काल(गुरुवारी) शिक्षा सुनावण्यात आली. ॲट्रॉसिटी प्रकरणात एवढ्या मोठ्या संख्येने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

सुनावनीवेळी सर्व आरोपींचे कुटुंबीय कोप्पल न्यायालयाच्या संकुलात जमले होते. न्यायालयाने शिक्षा सुनावताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, आरोपींना सध्या कोप्पल जिल्हा कारागृहात नेण्यात येणार असून, पुढे त्यांना बल्लारी कारागृहात ठेवण्यात येईल.

काय आहे प्रकरण?28 ऑगस्ट 2014 रोजी गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावात जातीनिहाय हिंसाचाराची घटना घडली होती. दलितांना न्हाव्यांची दुकाने आणि ढाब्यांमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने अचानक हाणामारी सुरू झाली. गावातील अस्पृश्यतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काही दलित तरुणांच्या सक्रियतेमुळे संतप्त झालेल्या आरोपींनी दलित वसाहतीत घुसून त्यांच्या झोपड्या पेटवून दिल्या आणि अनेकांवर हल्ला केला होता. 

सुनावणीदरम्यान 16 आरोपींचा मृत्यू झालाया घटनेमुळे राज्याच्या अनेक भागांत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर पीडितांना पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी 117 लोकांना आरोपी बनवले. गेल्या दहा वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. आता अखेर या खटल्याचा निकाल लागला. दरम्यान, गेल्या दहा वर्षात आरोपींपैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 101 आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

टॅग्स :KeralaकेरळCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी