शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Court: भ्रष्टाचाराचे आरोप; एटीएस अधिकारी निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 02:59 IST

Court: उच्च न्यायालयाने मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण खानविलकर यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. २०१० मध्ये भ्रष्टाचारप्रकरणी अटक होण्यापूर्वी त्यांनी मालेगावचे २००८ चे बॉम्बस्फोट प्रकरण, औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण व  २००६ च्या रेल्वे स्फोट प्रकरणाचा तपास केला होता.

मुंबई : उच्च न्यायालयानेमुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण खानविलकर यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. खानविलकर हे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) होते. २०१० मध्ये भ्रष्टाचारप्रकरणी अटक होण्यापूर्वी त्यांनी मालेगावचे २००८ चे बॉम्बस्फोट प्रकरण, औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण व  २००६ च्या रेल्वे स्फोट प्रकरणाचा तपास केला होता.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, खानविलकर आणि अन्य दोघांनी २६ आणि २७ डिसेंबर २००९ च्या मध्यरात्री एटीएसच्या पथकाने मुंबईतील मुलुंड परिसरातील एका क्लबवर छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने लॉटरी व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीसह काही लोकांना ताब्यात घेतले आणि त्यांना एटीएसच्या काळाचौकी पोलीस ठाण्यात नेले. लॉटरी विक्रेत्याने याबाबत तक्रार दिली, असे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.

तक्रारदारावर प्राणघातक हल्ला करून प्रकरणातून सोडण्यासाठी पोलिसांनी २० लाखांची मागणी केली.  खानविलकर यांनी तक्रारदाराला इतर प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी दिली, असा आरोप सरकारी वकिलांनी केला. तडजोडीनंतर खानविलकर यांनी १० लाख रुपये मागितले. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये द्यायची होती. 

२०१३ मध्ये सत्र न्यायालयाने खानविलकर यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली, तर त्यांच्या दोन साथीदारांना १० महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात खानविलकर व त्यांचे दोन साथीदार उच्च न्यायालयात गेले होते. खानविलकर यांनी लाच मागितल्याचा पुरावा खटल्यातून गायब आहे, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी  केला. त्यानंतर आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यात सरकारी वकील अयशस्वी ठरले    असून, आरोपींची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचे न्या. अजय गडकरी यांच्या  खंडपीठाने सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयMumbaiमुंबई