बेळगाव : एका दांपत्याला झोपेत असतानाच रॉकेल ओतून पेटविण्यात आल्याची घटना तीन दिवसांपूर्वी कोकटनुर (ता. अथणी) येथे घडली असून या अमानुष घटनेत पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे.मयत दाम्पत्याचे नाव रेखा महादेव मादर (वय 45) आणि महादेव सीताराम मादर (वय 50, दोघेही रा. कोकटनूर) अशी आहेत. गेल्या गुरुवार 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री हे दाम्पत्य झोपेत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले होते. सदर घटनेत गंभीर जखमी झालेल्या या दांपत्याला तातडीने हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा फायदा न होता रेखा मादर हिचा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 12 फेब्रुवारी रोजी उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाला. त्याचप्रमाणे महादेव मादर याचे गंभीर जखमांमुळे उपचाराचा फायदा न होता काल रविवारी निधन झाले. महादेव याच्यावर कोकटनूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत मादर दांपत्याच्या पश्चात दोन मुलगे व चार मुली असा परिवार आहे.भाऊबंदकी आणि कौटुंबिक कलहातून हा भीषण खुनाचा प्रकार घडला असल्याचा संशय असून याप्रकरणी ऐगळी पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वेगळी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून सदर दांपत्याला कोणी पेटविले? याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान सदर घटनेमुळे अथणी तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून प्रत्येक जण सोशल मीडियावर या घटनेची चर्चा करताना दिसत आहे.
रॉकेल ओतून दाम्पत्याची झोपेतच जाळून केली निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 20:15 IST
Double Murder : भाऊबंदकी आणि कौटुंबिक कलहातून हा भीषण खुनाचा प्रकार घडला असल्याचा संशय असून याप्रकरणी ऐगळी पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे.
रॉकेल ओतून दाम्पत्याची झोपेतच जाळून केली निर्घृण हत्या
ठळक मुद्देमयत दाम्पत्याचे नाव रेखा महादेव मादर (वय 45) आणि महादेव सीताराम मादर (वय 50, दोघेही रा. कोकटनूर) अशी आहेत.मयत मादर दांपत्याच्या पश्चात दोन मुलगे व चार मुली असा परिवार आहे.