शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधून दाम्पत्याने चोरल्या दारूच्या बाटल्या; एका बाटलीची किंमत ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 09:43 IST

Couple steals 45 wine bottles : ही घटना स्पेनमधील एट्रिओ नावाच्या प्रसिद्ध हॉटेलमधील आहे. हे हॉटेल आपल्या किंमती वाइन संग्रहासाठी (Wine Collection) प्रसिद्ध आहे.

माद्रिद : स्पेनमधील (Spain) एका हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरी केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये थांबलेल्या एका दाम्पत्याने (Couple) ही चोरी केल्याचे म्हटले जात आहे. आरोपी दाम्पत्याने सुमारे 45 दारूच्या बाटल्या चोरल्या, ज्यामध्ये एक 215 वर्षे जुनी बाटली सुद्धा होती. या जुन्या बाटलीची किंमत तीन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. (Couple steals 45 wine bottles, including bottle worth ₹3 cr from Spain hotel)

ही घटना स्पेनमधील एट्रिओ नावाच्या प्रसिद्ध हॉटेलमधील आहे. हे हॉटेल आपल्या किंमती वाइन संग्रहासाठी (Wine Collection) प्रसिद्ध आहे. या हॉटेलमध्ये एक दाम्पत्य राहण्यासाठी आले होते. या दाम्पत्याने संधी मिळताच हात साफ केला. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हे दाम्पत्य हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते, त्यावेळी त्यांनी या दारूच्या बाटल्यांची चोरी केली.

या दाम्पत्याने दारूच्या बाटल्या इतक्या चलाखीने चोरल्या की हॉटेल कर्मचाऱ्यांना अजिबात संशय आला नाही. विशेष म्हणजे सुरक्षा कॅमेऱ्यांकडेही कोणाचे लक्ष गेले नाही. यानंतर दोघेही मोठ्या आरामात हॉटेलमधून बाहेर पडले. काही वेळाने बाटली जागेवर न दिसल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले, ज्यामध्ये हे दाम्पत्य चोरी करताना दिसले. यामध्ये एकच नव्हे तर 45 बाटल्या हळूहळू चोरीला गेल्याचेही स्पष्ट झाले.

19 व्या शतकातील काही बाटल्याचोरीच्या काही बाटल्या १९व्या शतकातील असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यामधील एका वाईनच्या बाटलीची किंमत तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या सर्व बाटल्या या हॉटेलचे खास संग्रह होते आणि अतिशय नीटनेटकेपणे सजवल्या होत्या. दुसरीकडे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhotelहॉटेल