शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधून पळालेल्या प्रेमी युगुलाला अटक; मुलगी अल्पवयीन, प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 10:02 IST

पालघरमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रेमी युगुलाचा शोध घेण्यास पालघर-काश्मीर पोलिसांच्या टीमला यश

पालघर : प्रेमप्रकरणातून जम्मू काश्मीरमधून पळून आलेल्या आणि पालघरमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रेमी युगुलाचा शोध घेण्यास पालघर-काश्मीर पोलिसांच्या टीमला यश आले आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी जुल्फिकार मोहमद सादिक खटाना (वय २२) याला काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जम्मू काश्मीरच्या राजौरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या एका गावात राहणारा आरोपी तरुण जुल्फिकार याचे आपल्या जवळच राहत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधाला विरोध होऊ लागल्यानंतर प्रेमात आकंठ बुडालेल्या युगुलाने जम्मू-काश्मीरमधून पळ काढला. या प्रकरणी ५ मार्च रोजी  राजौरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. राजौरी पोलिसांनी आरोपीच्या मोबाइलचे लोकेशन ट्रेस केल्यावर ते विविध भागांत आढळून येत होते. पोलिसांनी याचा तपास सुरूच ठेवल्यानंतर आरोपीने आपला मोबाइल स्विच ऑफ करून ठेवल्याने अनेक दिवस त्याचा शोधच लागत नव्हता, मात्र काही दिवसांनंतर आरोपी तरुणाने आपला बंद ठेवलेला मोबाइल सुरू केल्यावर त्यावर तरुणाचे लोकेशन जोगेश्वरी, मुंबई आढळून आले. पोलिसांनी अधिक शोध घेतला असता जुल्फिकार याच्या ओळखीच्या व्यक्तीकडे जोगेश्वरीमध्ये राहत असल्याचे कळल्यावर राजौरी पोलिसांनी जुल्फिकार याच्याशी संपर्क साधत कुठेही जाऊ नकोस, आम्ही आपणास न्यायला येतो, असे कळवले.पकडतील या भीतीने काढला पळआपणास पोलीस पकडतील या भीतीने त्या प्रेमी युगुलाने जोगेश्वरीमधून पळ काढला. त्यांनी लोकल पकडून सरळ पालघर गाठत नवलीच्या विष्णूनगरमधील एक रूम भाड्याने घेतली. मागील ८-१० दिवस ते पालघरमध्ये राहिल्यानंतर पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रमेश पालवे आणि महिला पोलीस कदम यांच्या मदतीने राजौरी पोलिसांनी या युगुलाला ताब्यात घेतले. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राजौरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून, शुक्रवारी या दोघांना घेऊन राजौरी पोलीस जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले.