शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : Yes Bank सुरु झाली खरी, पण राणा कपूरला आलेय वेगळेच टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 17:31 IST

Coronavirus : राणा कपूर यांचे वकील पोंडा म्हणाले की, "कोरोना विषाणू खूप वेगाने पसरत आहे. सध्या परिस्थिती अत्यंत संवदेनशील बनली आहे.

ठळक मुद्देराणा कपूर याला या महिन्याच्या सुरुवातीलाच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत ईडीने अटक केली. राणाने त्याला ६ - ७ वर्षांपासून दम्याचा आजार असल्याचे सांगितले. तसेच त्याची रोगप्रतिकारक क्षमता खूप कमी झाली असल्याचे त्याने पुढे सांगितले.

मुंबई - मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, त्याला कारागृहात कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याची भीती त्याच्या वकिलांनी विशेष न्यायालयात व्यक्त केली. येस बँकेवरील निर्बंध उठवले असले तरी राणा कपूरने कारागृहात कोरोनाची धास्ती घेतली आहे.

ईडीने ६२ वर्षीय कपूरला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी राणा कपूरला कोणता आजार आहे याबाबत विचारणा केली, त्यावेळी राणाने त्याला ६ - ७ वर्षांपासून दम्याचा आजार असल्याचे सांगितले. तसेच त्याची रोगप्रतिकारक क्षमता खूप कमी झाली असल्याचे त्याने पुढे सांगितले. राणा कपूरचे वकील अबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल त्यांना कोरोना व्हायरस होण्याची शक्यता आहे.

राणा कपूर यांचे वकील पोंडा म्हणाले की, "कोरोना विषाणू खूप वेगाने पसरत आहे. सध्या परिस्थिती अत्यंत संवदेनशील बनली आहे." जर राणा तुरुंगात गेला तर तो अत्यंत गंभीर विषाणूच्या विळख्यात अडकू शकतो. त्यावर कोर्टाने जेल प्रशासनाला राणा कपूरची योग्य काळजी घेऊन औषधे उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. ईडीने राणा कपूरच्या कोठडीत मुदतवाढ मागितली नाही, त्यामुळे न्यायाधीश परशुराम जाधव यांनी त्यांना २ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.राणा कपूर याला या महिन्याच्या सुरुवातीलाच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत ईडीने अटक केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, राणा कपूर येस बँकेचे कामकाज सांभाळत असताना त्याने ३० हजार कोटी रुपये कर्ज दिले. त्यातील २० हजार कोटी रुपये बुडीत निघाले. सीबीआयही तपास करीत आहे. राणा कपूर याला सीबीआय कोर्टापुढे हजर करण्यासाठी सीबीआयने प्रोडक्शन वॉरंट मिळवल्याचे पोंडा यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याYes Bankयेस बँकjailतुरुंगCourtन्यायालय