शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus :...म्हणून पत्नीने केली पतीची हत्या, कोरोनाने मृत्यू झालं सांगण्याचा केला प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 23:21 IST

Coronavirus : पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यातून श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. 

ठळक मुद्दे शरत दास (४५) असे मृताचे नाव असून तो दुकानदार होता. ३५ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली.सकाळी उठल्यानंतर अनिताने शेजाऱ्यांना आपले पती बेशुद्ध पडले असून कुठलीही हालचाल करत नाही असं सांगितले.

उत्तरपूर्व दिल्लीतील अशोक विहारमध्ये ही धक्कादायक घटना घडली. ३५ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. इतक्यावरच न थांबता जगावर आलेल्या कोरून संकटाचा तिने फायदा घेत करोना व्हायरसमुळे पतीचा मृत्यू झाला असे भासविण्याचा प्रयत्न केला. मृत पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यातून श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. 

शरत दास (४५) असे मृताचे नाव असून तो दुकानदार होता. त्याच्या पत्नीचे नाव अनिता दास. २ मे रोजी सकाळी उठल्यानंतर अनिताने शेजाऱ्यांना आपले पती बेशुद्ध पडले असून कुठलीही हालचाल करत नाही असं सांगितले. कोरोना व्हायरसमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा शक्यता  असल्याचं तिने सांगितली. शेजाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.

Coronavirus Lockdown : मिठी मारली म्हणून तरुणाला चोप देणाऱ्या पोलिसाचे निलंबन  

 

‘बाप’ फोटो... लेकीच्या खांद्यावरचे तारे वडिलांनी न्याहाळले, नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले

 

बाबरी मशीद प्रकरणी खटल्याची सुनावणी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - सुप्रीम कोर्ट 

दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर अनिताकडे चौकशी केली. अनिता पोलिसांना समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. शरत दास आजारी नव्हते, त्यांची प्रकृती उत्तम होती असे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. कोरोनाच्या टेस्टबाबत पोलिसांनी रिपोर्ट दाखवायला सांगितला. त्यावेळी अनिताकडे कुठलेही कागदपत्र नव्हते. ४ मे रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर गुदमरुन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अनिताला चौकशीसाठी बोलावले. पोलीस चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपले दुसऱ्या एका व्यक्तीवर प्रेम आहे. अडथळा दूर करण्यासाठी आणि नवऱ्यापासून सुटका करुन घेण्यासाठी त्याची हत्या केल्याचे तिने कबूल केले. मृत शरतला अनिताच्या प्रेमसंबंधांबद्दल माहिती होती. त्यावरुन त्यांच्यात सतत भांडणे सुद्धा होत होती. १ मे रोजी रात्री शरत झोपल्यानंतर तिने प्रियकर संजयला घरी बोलावले आणि दोघांनी ब्लॅंकेटच्या मदतीने गळा आवळून शरतची हत्या केली.

टॅग्स :Murderखूनdelhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस