शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी धोरण आखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 20:25 IST

Coronavirus : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

ठळक मुद्देआतापर्यंत ७७ कैदी आणि २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.आर्थर रोड कारागृहातील एक कैदी अली अकबर श्रॉफ याने वैद्यकीय कारणास्तव तात्पुरती जामिनावर सुटका करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

मुंबई : आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा वाढत चाललेल्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. आतापर्यंत ७७ कैदी आणि २६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

ताण कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम, ऑन ड्युटी पोलिसाचा केला बर्थडे साजरा    

आर्थर रोड कारागृहातील एक कैदी अली अकबर श्रॉफ याने वैद्यकीय कारणास्तव तात्पुरती जामिनावर सुटका करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या.भारती डांगरे यांच्यापुढे सुनावणी होती. परिस्थिती अनिश्चित आहे आणि अशा परिस्थितीत राज्य सरकारने व धोरण आखणाऱ्यांनी यावर निर्णय घ्यावा, असे न्या. डांगरे यांनी म्हटले.

आर्थर रोड कारागृहात १०० पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब सत्य असेल तर ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली नाही, त्यांना कारागृहातील गर्दीमुळे कोरोना झाली, अशी सबब सरकारने किंवा कारागृह प्रशासनाने देऊ नये, असेही न्या. डांगरे यांनी म्हटले. कैद्यांनाही सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळविण्याचा अधिकार आहे, हे प्रशासनाने लक्षात ठेवावे, असे म्हणत न्या. डांगरे यांनी राज्य सरकार व प्रशासनाने योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

'अशा स्थितीत कारागृह प्रशासन संवेदनशीलपणे वागेल, अशी आशा आणि अपेक्षा आहे,' असे न्यायालयाने म्हटले. अनेक कैदी ६० वर्षांपेक्षा अधिक आहेत आणि ते वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत. या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार व कारागृह प्रशासन योग्य तो धोरणात्मक निर्णय घेऊ शकते,' असे न्यायालयाने म्हटले. श्रॉफ यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी श्रॉफ याला हायपर टेन्शन, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्याची जामिनावर सुटका करावी, अशी विनंती पौडा यांनी न्यायालयाला केली. मात्र, यापैकी एकही लक्षण कैद्यामध्ये नाही, असे म्हणत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. 

टॅग्स :Arthur Road Jailआर्थररोड कारागृहHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबईPrisonतुरुंग