शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पतीने केली पोलिसात तक्रार, माझी पत्नी लॉकडाऊनचे नियम पालन करत नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 21:27 IST

Coronavirus : लॉकडाऊनदरम्यान समाजात अशी अनेक प्रकरणे पाहायला मिळतात ज्यात काही नवीन संबंध जोडले जात आहेत आणि काही लोकांचे संबंध बिघडताना दिसत आहेत. 

ठळक मुद्देआपली पत्नी लॉकडाउनचे नियम पालन करीत नाही. त्यानंतर पती पत्नीची तक्रार घेऊन पोलिसांकडे पोहोचला.घरात सर्व आवश्यक वस्तू आहेत, तरीही बायको लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत नाही. 

मेरठ - जगभरात कोरोना विषाणूचा हाहाकार वाढत आहे. त्याचवेळी, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाउन देखील लागू करण्यात आला आहे. दरम्यान, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, परंतु तरीही लोक लॉकडाऊनला हरताळ फासत आहेत. याशिवाय लॉकडाऊनदरम्यान समाजात अशी अनेक प्रकरणे पाहायला मिळतात ज्यात काही नवीन संबंध जोडले जात आहेत आणि काही लोकांचे संबंध बिघडताना दिसत आहेत. अशीच एक घटना मेरठमध्ये समोर आली आहे. जेथे एका पतीने आरोप केला आहे की, आपली पत्नी लॉकडाउनचे नियम पालन करीत नाही. त्यानंतर पती पत्नीची तक्रार घेऊन पोलिसांकडे पोहोचला. पत्नीवर नाराज झाल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती मिळत आहे.हे प्रकरण मेरठच्या पोलिस स्टेशनच्या लिसाडी गेट परिसराच्या खुशी नगरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. जेथे अमजद नावाच्या व्यक्तीने लिसाडी गेट पोलिस ठाण्यात जाऊन पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दिली. लेखी तक्रार पत्रात पतीने पत्नीचे नाव फरिदा असे म्हटले आहे. ती लॉकडाउनचे नियमांचे पालन करीत नाही. त्यामुळे त्याला त्रास झाला आहे. नवऱ्याने सांगितले की, त्याने पत्नीविषयी सासरच्यांनाही तक्रार केली आहे. नवरा म्हणतो की, घरात सर्व आवश्यक वस्तू आहेत, तरीही बायको लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत नाही. 

नवऱ्याने केलेल्या तक्रारीकडे तिच्या सासरच्यांनीही दुर्लक्ष केले असा आरोप अमजदने केला आहे. त्यानंतर तो अस्वस्थ झाला आणि मेरठच्या लिसाडी गेट पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पत्नीवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी पतीची मागणी आहे. स्वत: अमजद मोटरसायकलवरून कोरोनाविरूद्ध जनजागृती मोहीम राबवित आहे. मात्र, पोलिस स्टेशनचे पोलिस सांगतात की, आतापर्यंत तपासात काहीच समोर आले नाही. या प्रकरणात मेरठचे एसपी सिटी अखिलेश नारायण म्हणतात, 'दोन दिवसांपूर्वी ही तक्रार करण्यात आली होती. लोकांना समजावले जात आहे. जे लोक ऐकत नाही अशा लोकांवर कारवाई केली जाईल. त्याचवेळी पतीच्या तक्रारीवरून हे प्रसिद्धीसाठी केले गेलेले  कृत्य नाही ना याचा पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या