शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus कोरोनाने राज्यापुढे आणखी एक मोठे संकट वाढून ठेवले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 07:44 IST

गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या नावसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंंक तयार करून आॅनलाइन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकृत लिंंकवरूनच मदत करा, असे सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात आले.

मुंबई : कोरोनाबाबत अफवांचे पीक वाढू लागले असून त्याला धार्मिक रंग चढवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न जोर धरत आहेत़ हे संकट कायम असताना डिजिटल सेवेकडे वाढलेला कल, राज्य शासनाकड़ून मिळणाऱ्या विविध सवलती, उपाययोजनांचा फायदा घेत सायबर भामटे फसवणूक करत आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर करत आहेत.गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या नावसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंंक तयार करून आॅनलाइन भामट्यांनी फसवणुकीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकृत लिंंकवरूनच मदत करा, असे सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात आले.त्यासोबतच प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून पैसे मिळतील, दोन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स सेवा किंंवा इंटरनेट सेवा मोफत देण्यात येईल, जीओचे पाचशे रुपयांचे रिचार्ज मोफत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रत्येकाला ६० जीबी इंटरनेट सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे, आदी आमिषे समाजमाध्यमांवरून दाखविली जात आहेत.हे ठग बँक अधिकारी / कर्मचारी बोलत असल्याचे सांगून त्यांची बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती घेत फसवणूक करत असल्याचे मुंबई सायबर पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. तसेच या ठगांनी खातेदारांना संदेश धाडून त्याद्वारे ंल्ल८ीि२‘, द४्रू‘ र४स्रस्रङ्म१३, ळीें श््री६ी१, अल्ल१िङ्म्र िसारखे स्क्रीन शेअरिंंग अ‍ॅप डाउनलोड करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाइल व संगणकाचा अनधिकृत तांबा घेत फसवणूक करत असल्याचे प्रमाण वाढत आहेत.व्हॉट्सअ‍ॅपवरून अफवांना जोर...गेल्या पाच दिवसांमध्ये समाजमाध्यमांवरून कोरोना प्रादुर्भावासाठी ठरावीक एका समाजाला जबाबदार धरण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात सायबर पोलिसांनी एकूण २० गुन्हे नोंदवले. त्यापैकी १४ गुन्ह्यांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार समोर आला. उर्वरित सहा गुन्हे कोरोनाबाबतच्या अफवा होत्या. अशात आतापर्यंत सायबर महाराष्ट्रकडून  राज्यभरात एकूण १३५ गुन्हे नोंदवण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcyber crimeसायबर क्राइम