शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सचिवाविरोधात गुन्हा, कोरोनाबाबतची माहिती घेण्यास आलेल्या कर्मचाऱ्याला सोसायटीत रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 21:54 IST

CoronaVirus : या आरोपीने सदरची माहिती जनगणना आदीसाठी वापरली जाणार असल्याचा कांगावा करत लोकांना जमवल्याने तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देआज मंगळवारी पालिकेचे पथक पोलीसांसह पूजा नगर मधील मेडतिया हेरीटेज या इमारतीत तपासणी गेले सोसायटीचा सचिव जफर जमाल खान (५५) याने गोंधळ घालण्यास सुरवात केली.

मीरारोड - मीरारोडमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने महापालिकेने परिसरातील रहिवाशांच्या घरोघरी जाऊन तपासणी सुरु केली असताना पालिका कर्मचारायांना इमारतीच्या आवारात प्रवेश न देणाऱ्या  गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाविरोधात नया नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीने सदरची माहिती जनगणना आदीसाठी वापरली जाणार असल्याचा कांगावा करत लोकांना जमवल्याने तणाव निर्माण झाला होता.कानुगो इस्टेटमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने महापालिकेने सदर वसाहत व परिसरातील इमारतीमध्ये राहणाराया रहिवाशांची तपासणी, कोरोना सृदश लक्षण असल्याची पडताळणी व माहिती गोळा करण्यास सुरवात केली आहे. कारण कोरोनाचा संसर्ग शहरात पसरु नये म्हणुन १ किमी परिसरात निर्जतुकीकरण करण्यासह तपासणी महत्वाची असल्याने पालिकेने युध्दपातळीवर वैद्यकिय कर्मचारी व आशा वर्कर यांना तैनात केले आहे. शिवाय सोबत पोलीस देखील दिलेले आहेत.आज मंगळवारी पालिकेचे पथक पोलीसांसह पूजा नगर मधील मेडतिया हेरीटेज या इमारतीत तपासणी गेले असता सदर सोसायटीचा सचिव जफर जमाल खान (५५) याने गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्याने ही माहिती जनगणना नोंदणी आदी साठी वापरली जाणार असल्याचा कांगावा करत लोकांमध्ये भिती निर्माण केली. लोकांना गोळा करुन तणाव निर्माण केला. त्यामुळे सदर इमारतीतील रहिवाशांची तपासणी व माहिती घेता आली नाही.याची नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी गांभीर्याने दखल घेत सचिवाविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करुन घेण्याचे निर्देश दिले. त्या नुसार वैद्यकिय पथकासोबत असलेले पोलीस नाईक बाबाजी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन जफर खान विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Policeपोलिसmira roadमीरा रोडcorona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिका