शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाचा रुग्ण सापडलेल्या कॉल सेंटरने ठाण्यात थाटला कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:39 IST

ठाणे पालिकेने हा प्रकार उघडकीस आणून मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाणे : कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शासनाने ते बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नवी मुंबईतील त्या कॉल सेंटरच्या मालकाने ते बंद न करता, त्यातील ४०० पेक्षा अधिक कर्मचारी ठाण्यात आणून पुन्हा व्यवसाय सुरू केल्याचा प्रकार उघड झाला आहे.ठाणे पालिकेने हा प्रकार उघडकीस आणून मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ठाण्यातील ढोकाळी येथे ज्या इमारतीमध्ये या ४०० कर्मचाऱ्यांना आणले होते, तेथे त्यांना बंदिस्त करून त्यांची तपासणी केली. त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. तपासणी केल्याशिवाय एकही कर्मचाºयाला या इमारतीच्या बाहेर जाऊ दिलेले नाही.ऐरोली येथील कॉल सेंटरच्या एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानंतर, या कंपनीने ऐरोली येथील सेंटर बंद करून येथील ४०० कर्मचाऱ्यांना ठाण्यातील ढोकाळी परिसरात शरदचंद्र पवार मिनी स्टेडियमच्या बाजूला इमारतीमध्ये स्थलांतरित केले. हे समजताच जिल्हाधिकारी महापालिका प्रशासनाला अ‍ॅलर्ट केले. त्यानंतर, गुरुवारी रात्री ११.३०च्या दरम्यान स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनीदेखील हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्या ठिकाणी धाव घेऊन पुन्हा नवी मुंबईत जाण्यास सांगितले. मात्र, याकडे कंपनीने दुर्लक्ष केले. त्यानंतर, पालिकेचे आरोग्य पथक व पोलिसांनी तेथे जाऊन ४०० कर्मचाºयांना त्याच ठिकाणी बंदिस्त केले. त्यानंतर, त्यांची त्याच ठिकाणी तपासणी केली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.अद्याप गुन्हा दाखल नाहीकापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला. नवी मुंबईच्या ज्या कंपनीमधून हे कर्मचारी ठाण्यात आले होते, त्यांची तपासणी केली असून हे सर्व कर्मचारी निगेटिव्ह असल्याचे ते म्हणाले. यामुळे अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे