नांदेड : लग्नामध्ये नवीन ड्रेस घेऊन न दिल्याने आजी-आजोबांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना २३ मे रोजी घडली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शेख हाजरस बेगम महमंद रफीक यांनी ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या बहिणीच्या घरी मुजामपेठ येथे लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुटुंबीयांनी नवीन कपडे घेतले होते. शेख हाजरस यांचा भाचा शेख अल्ताफ शेख खयूम (३०) याने नवीन ड्रेस घेऊन देत नसल्याने कुटुंबीयांशी वाद घातला. यावेळी हाजरस बेगम यांचे वडील समजूत घालण्यासाठी गेले असता त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. यावेळी त्यांच्या पत्नीने मध्यस्थी केली असता, त्यांच्यावरही कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी नोंद केली.
Coronavirus: नवीन ड्रेस न मिळाल्याने आजी-आजोबांवर कुऱ्हाडीने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 09:58 IST