शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

coronavirus: मुंबईत २ लाख ९० हजार ९१३ रुग्णांनी केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 07:14 IST

coronavirus: शहर उपनगरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग येत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. तर आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे मुंबईत दिवसभरात २४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई : शहर उपनगरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग येत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. तर आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे मुंबईत दिवसभरात २४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ९० हजार ९१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे शहर उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५५९ दिवसांवर पोहोचला आहे.मुंबईत रविवारी ४८३ रुग्ण आणि ८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ८ हजार ९६९ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ३५१ झाला आहे. सध्या ५ हजार ७९७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के असून, २४ ते ३० जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.१२ टक्क्यांवर गेला आहे. शहर उपनगरात आतापर्यंत कोरोनाच्या २८ लाख ४ हजार १८२ चाचण्या झाल्या आहेत. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १९९ असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २ हजार ८६ आहे.  राज्यात ४५,०७१ सक्रिय रुग्णमुंबई : राज्यात दिवसभरात १,६७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १९ लाख २९ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१९% झाले आहे. तर सध्या राज्यात ४५ हजार ७१ इतके सक्रिय रुग्ण आहेत.राज्यात २ हजार ५८५ रुग्ण आणि ४० मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख २६ हजार ३९९ झाली असून बळींचा ५१ हजार ८२ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ४० मृत्यूंपैकी १५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.  आजपर्यंत तपासलेल्या १ कोटी ४६ लाख १७ हजार १६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.८६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९० हजार २३२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २ हजार २९४ व्यक्त संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई