शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून वाद? बाळेघोल येथील तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 14:48 IST

घटनास्थळी चर्चा - सेनापती कापशी हद्दीत घडली घटना 

- शशिकांत भोसले 

लोकमत न्यूज नेटवर्क  सेनापती कापशी : बाळेघोल (ता. कागल) येथील भरत बळीराम चव्हाण  (वय ३२) या तरुणाचा अनैतिक संबंधातील वादातून   गावठी कट्ट्यातून कानशिलात गोळी झाडून खून करण्यात आला. घटनास्थळावरून  संशयीत आरोपी विकास हेमंत मोहिते ( रा.बाळेघोल, वय२५) हा थेट मुरगूड पोलिस ठाण्यात स्वतः हुन  हजर झाला.सकाळी साडे दहाच्या सुमारास सेनापती कापशी हद्दीत ही घटना घडली.

 याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,  संशयित आरोपी विकास मोहिते याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय भरत चव्हाण याला होता. यातुनच भरत व त्याची पत्नी यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते . परिणामी चार वर्षांपूर्वी भरत चव्हाण यांने पत्नीला घटस्फोट दिला होता. तेंव्हापासून भरत चव्हाण व विकास मोहिते यांच्यामध्ये पूर्ववैमनस्यातून वारंवार खुन्नस व वाद होत होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. 

 आज सकाळी भरत चव्हाण हा आपला मित्र ओंकार जाधव याच्यासोबत सेनापती कापशी हद्दीत असणार्या चिगरे पाणंद येथे विहीरीवर कामासाठी जात होता. यावेळी विकास मोहिते याने मोटारसायकल आडवी मारुन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला.दरम्यान विकास मोहिते याने भरत याला मोटरसायकल वरुन खाली उतरवले व डाव्या कानशिलात गावठी कट्ट्यातून गोळी झाडली यामुळे  जागेवरच भरत हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी मोठा आवाज झाल्याने आजुबाजुला शेतात काम करणारे शेतकरी घटनास्थळी धावुन आले. गोळी झाडून आरोपी विकास मोहिते हा थेट मुरगूड पोलिस ठाण्यात हजर झाला. संशयित आरोपी विकास मोहिते हाही विवाहित आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी