शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवासात दारूच्या नशेत प्रवाशांचा गोंधळ; दोघांवर कारवाई, सहार पोलिसांकडून तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:23 IST

बुधवारी ते दुबई ते मुंबई या विमानामध्ये कर्तव्यास होते.

मुंबई : दुबई ते मुंबई विमान प्रवासात दोन प्रवाशांनी दारूचे सेवन करत विमानात गोंधळ घातल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी सहार पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई केली. भांडुप परिसरात राहणारे मनदीप सुरेंदर सिंग (२६) हे इंडिगो लिमिटेडमध्ये सिनिअर केबिन क्रू म्हणून कार्यरत आहे.

बुधवारी ते दुबई ते मुंबई या विमानामध्ये कर्तव्यास होते. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण घेतले. यादरम्यान कोणीही विमानात दारूचे सेवन करू नये याबाबत वेळोवेळी घोषणा केली. उड्डाणानंतर सकाळी ८ च्या सुमारास सीट नंबर १८ इ आणि २० बी वरील प्रवासी दारूचे सेवन करताना दिसले.

शेजारील अन्य प्रवाशांनी त्यांना हटकताच एक प्रवासी मागच्या सीटवर जाऊन बसला. तर, दुसरा तेथेच बसून नशा करत होता. त्याला दारू पिण्यास मनाई असून कारवाई करण्यात येईल असे सांगताच, तो जागेवरून उठून विमानातील मोकळ्या जागेत फिरत गोंघळ घालत होता. 

परदेशातून वर्षभराने  घरी परतत होतेचौकशीत दत्तात्रय आनंद बापर्डेकर (४७) हा कोल्हापूरचा तर जॉन जॉर्ज डिसूजा (४९) हा नालासोपारा येथील रहिवासी असल्याचे समजले. मुंबई विमानतळावर उतरताच दोन्ही प्रवाशांना सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. विमानात दारूचे सेवन करत विमान सुरू असताना रिकाम्या जागेत फिरून विमानातील नियमांचा भंग केला. तसेच, विमानामध्ये गोंधळ घालून विमानातील सर्व प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक करण्यात आली. दोघेही दुबई येथे नोकरीला आहे. वर्षभराने ते घरी परतत होते. 

सातवी घटना यावर्षी आतापर्यंतची अशाप्रकारे विमानात गोंधळ घालण्याची ही सातवी घटना असल्याची माहिती समोर येत आहे. ११ मार्च रोजी लंडन ते मुंबई प्रवासादरम्यान एका प्रवाशाने धूम्रपान करत थेट आपातकालीन मार्गावरील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी