शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

दोन मासेमारी गटात भर समुद्रात संघर्ष; एलईडी फिशींगवरुन झाला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 20:34 IST

दोन्ही गटातील बोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते.

ठळक मुद्देअद्यापही दोन्ही गटांच्या बोटी समुद्रामध्येच प्रवासात आहेत. तेथील काही मासेमारी करणारे पूर्ण तयारीकरुन आपल्या सहकार्याच्या मदतीला निघाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बोडणीमधील मासेमारी करणाऱ्यांनी आक्षीमधील बोटींवर ताबा मिळवला.

आविष्कार देसाई

अलिबाग - मासेमारी करणाऱ्या दोन गटांमध्ये मुरुड-कोर्लईच्या भर समुद्रामध्ये संघर्ष उफाळून आला. अलिबाग तालुक्यातील आक्षीमधील एक गट एलईडी फिशींग करत असल्याने त्यांना रेवस - बोडणीमधील मासेमारी करणाऱ्यांनी हटकले असता दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही गटातील बोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. बोडणीमधील मासेमारी करणाऱ्यांनी आक्षीमधील बोटींवर ताबा मिळवला. त्यानंतर ते मांडव्याच्या दिशेने त्यांना घेऊन निघाले आहेत. त्यांना पोचण्यासाठी तब्बल सहा तासांचा अवधी लागणार असल्याचे बोलले जाते.एलईडी फिशींग करणे कायद्याने गुन्हा असताना देखील आक्षी येथील चार मासेमारी बोटी एलईडीच्या माध्यमातून मुरुड-कोर्लई परिसरात मासेमारी करत होत्या. सदरची बाब रेवस-बोडणी येथील मासेमारी करणाऱ्यांना आढळली. त्यामुळे त्यांनी आक्षीवाल्या बोटीतील मासेमारी करणाऱ्यांना हटकले. त्याचा राग आल्याने एका गटाने दुसऱ्या गटावर दगड फेक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे बोडणीमधील गटाने त्याच परिसरात मासेमारी करणाऱ्या अन्य सहकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानतंर काही कालावधीत अन्य बोटी तेथे आल्यानंतर दोन्ही गटामध्ये भर समुद्रामध्य संघर्ष सुरु झाला. त्यानंतर रेवसमधील मासेमारी करणाऱ्यांनी आक्षीच्या बोटींवर ताबा मिळवला आणि त्यांना पकडून मांडवा सागरी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी ते निघाले. ही बाब आक्षीमधील अन्य मासेमारी करणाऱ्यांना कळताच. तेथील काही मासेमारी करणारे पूर्ण तयारीकरुन आपल्या सहकार्याच्या मदतीला निघाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हे नाटय़ समुद्रामध्ये सुरु होते.

आक्षी आणि बोडणी परिसरातील दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याची माहिती मिळाली आहे. सदरची घटना 12 नॉटीकल माईल्स्च्या बाहेर झाली असल्याने हे प्रकरण मुंबई यलोगेट पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याचे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

याबाबत भारतीय तट रक्षक दलाचे सहायक कमांडंट कृष्णा कुमार यांच्यासी संपर्क साधला असता त्यांनी सुट्टीवर असल्याचे सांगितले. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी मुरुड येथील तट रक्षक दलाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे लोकमतशी बोलताना सांगितले. दोन गटामध्ये संघर्ष झालेला आहे. सदरची घटना 12 नॉटीकल माईल्सच्या बाहेरची आहे. असे असले तरी, संबंधीतांनी आमच्याकडे तक्रार दिल्यास ती घेतली जाईल. अद्यापही दोन्ही गटांच्या बोटी समुद्रामध्येच प्रवासात आहेत. त्यांना पोचण्यासाठी सुमारे सहा तासांचा अवधी लागेल. परिस्थीतवर आम्ही लक्ष ठेऊन असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसFishermanमच्छीमार