मोहोपाडा : रिस-कांबा येथील श्री वैष्णोनगरीच्या काही अंतरावर असलेल्या कातरीचा माळ येथे निर्मनुष्य जागेत महिलेचा सांगाडा आढळून आला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी मृतदेह तिथेच टाकून पसार झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.रिस-कांबा कातरीच्या माळावर मानवजातीचा सांगाडा असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली, त्यानुसार रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे व सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या सांगाड्याची पाहणी केली असता तो अंदाजे २२ ते २५ वर्षे वयोगटातील महिलेचा असल्याचा अंदाज बांधला. या वेळी पोलिसांनी डॉक्टर व फॉरेन्सिीक लॅब बोलावून त्यांच्याकडून तपासणी केली असता १५ ते २० दिवसाआधी महिलेचा मृत्यू झाला असून, डोक्याच्या कवटीकडील भागाला क्रॅक गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी घेरीडकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे.
माळरानात आढळला महिलेचा सांगाडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 01:52 IST