शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणीचा विनयभंगप्रकरणी नौदल अधिका-याला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 23:27 IST

मोलकरणीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेला नौदल अधिकारी मनीकंदन नांबियार (44) याला आज गुरुवारी गोव्यातील दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

मडगाव: मोलकरणीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेला नौदल अधिकारी मनीकंदन नांबियार (44) याला आज गुरुवारी गोव्यातील दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. न्यायाधीश सायनोरा लाड यांच्या न्यायालयाने नंबियार 20 हजार रुपये तसेच दोन दिवस सकाळी नऊ ते सांयकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात हजेरी लावणे व तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजेरी लावणे या अटीवर सशर्त जामीन अर्ज मंजूर केला. साक्षीदारावर दबाव आणू नये अशीही अट घालण्यात आली आहे.गोवा नौदल विभागात नौदलाचा वरिष्ठ अधिकारी असलेला नांबियार याच्या विरुद्ध त्याच्या घरी मोलकरणी म्हणून कामाला असलेल्या एका महिलेने पोलिसांत तक्रार केली होती. त्यात संशयिताने आपला विनयंभ केल्याचे नमूद करण्यात आले होते. भारतीय दंड संहितेच्या 354 , 354 (अ), 354 (ब) कलमाखाली वास्को पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी मनीकंदन नांबियार याची चौकशी सुरु केली असता अचानक त्याची प्रकृती बिघाडल्याने त्याला इस्पितळात दाखल करावे लागले होते.संशयित हा नौदल अधिकारी आहे. तसेच पीडित महिला ही विधवा असून, तिला दोन मुलेही आहे. संशयित तिच्यावर दबाव टाकू शकत असल्याने त्याला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये अशी मागणी पोलिसांतर्फे या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना न्यायालयात केली होती. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील व्ही.जे. कॉस्ता तर संशयितार्फे वकील दिलेश्वर नाईक यांनी बाजू मांडली.