शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रश्मी शुक्लांसह सहा जणांविरुद्ध तक्रार; ‘कॉल टॅपिंग’च्या साधनांचा गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 09:40 IST

‘कॉल टॅपिंग’च्या साधनांचा गैरवापर

अमरावती : कॉल टॅपिंग (इंटरसेप्शन) करण्याच्या साधनांचा गैरवापर करून फोन टॅप करणे तसेच आपल्या पदाचा दुरुपयोग करून खोटी चौकशी  लावणे, तपास अधिकाऱ्यावर दबाव  टाकणे, वैयक्तिक जीवनातील गोपनीयता भंग करणे अशा प्रकारचे गंभीर आरोप करीत शहर पोलीस आयुक्तालयातील उच्चश्रेणी लघुुुलेखक देवानंद भोजे यांनी अमरावती जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन., राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला (सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत) यांच्यासह सहा जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

सदर तक्रार १८ जून रोजी नोंदविण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्ध थेट तक्रार असल्याने या संदर्भात पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांचे मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली. देवानंद भोजे हे पूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांचे स्टेनो म्हणून कार्यरत होते. गैरअर्जदार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन., राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला, अमरावती ग्रामीण स्टेनो टायपिस्ट जगदीश देशमुख, पोलीस शिपाई रूपेश पाटील, कार्यालय अधीक्षक किशोर शेंडे यांच्या नावाचा तक्रारीत समावेश असून त्यात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.

आरोप धादांत खोटे 

कॉल टॅपिंग (इंटरसेप्शन) करण्याच्या साधनांचा गैरवापर केल्याच्या तक्रारीतील या प्रकरणात माझ्यावर लावण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत.- डॉ. हरी बालाजी एन., जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अमरावती

आयुक्तांचे मार्गदर्शन 

पदाचा दुरुपयोग करून खोटी चौकशी लावणे, तपास अधिकाऱ्यावर दबाव टाकणे,  वैयक्तिक जीवनातील गोपनीयता भंग करणे  आदी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी असल्याने  ती चौकशीत ठेवली असून त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.- आसाराम चोरमले,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPoliceपोलिस