शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरण: सहकार्य न करणारी तक्रारदार, तिच्या आईवर कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 09:16 IST

सतरा वर्षीय राज्यस्तरीय थ्रोबॉल खेळाडू आरोपीला जानेवारी २०१९ मध्ये भेटली. मुंबईत ती काही ठिकाणी सराव करायची. एक दिवस आरोपीने तिला त्याच्या घरी बोलावले आणि तिला प्रपोज केले. त्याच महिन्यात त्यांचे एकमेकांशी शारीरिक संबंध आले.  

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कथित बलात्कार प्रकरणातील आरोपीविरोधात केलेली तक्रार पुढे नेण्याची इच्छा नसल्याचे म्हणणाऱ्या पीडितेला व तिच्या आईविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश विशेष पॉक्सो न्यायालयाने सरकारी वकिलांना दिले. संबंधित आरोपीवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारदार व तिच्या आईने सहकार्य न केल्याने खटल्यात तथ्य राहिले नाही. प्रकरणाचा मणकाच तुटला. आरोपीचे  दोषत्व सिद्ध करणारे पुरावेच रेकॉर्डवर नाहीत. या पॉक्सोच्या प्रकरणात तक्रारदार व तिची आई सरकारी वकिलांच्या महत्त्वाच्या साक्षीदार होत्या, असे दिंडोशी सत्र न्यायालयाचे विशेष न्या. एच. सी. शेंडे यांनी म्हटले.सतरा वर्षीय राज्यस्तरीय थ्रोबॉल खेळाडू आरोपीला जानेवारी २०१९ मध्ये भेटली. मुंबईत ती काही ठिकाणी सराव करायची. एक दिवस आरोपीने तिला त्याच्या घरी बोलावले आणि तिला प्रपोज केले. त्याच महिन्यात त्यांचे एकमेकांशी शारीरिक संबंध आले.  

तक्रारीनुसार, संबंधित मुलीची मार्च २०१९ मध्ये मासिक पाळी चुकली आणि त्याचवेळी तिला कावीळही झाली. सुरुवातीला तिला वाटले की ती आजारी आहे म्हणून तिला मासिक पाळी आली नाही. तिने जूनपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर ती २४ आठवड्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले.  त्यांनतर मुलीने व तिच्या आईने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार केली, दुसरीकडे आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप फेटाळला. दोघांमधील गैरसमजुतीमुळे आपल्याला नाहक या प्रकरणात गोवले आहे. आपले एकमेकांवर प्रेम होते आणि आम्ही एकमेकांशी विवाह केला आणि आमच्या मुलीबरोबर आनंदाने राहात असल्याचे सांगितले.

न्यायालयाने काय म्हटले?घटनेच्यावेळी आरोपी अल्पवयीन होती, हे सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही. तसेच तक्रारदारने स्वतः म्हटले आहे की, ती सांताक्रूझ पोलीस ठाण्यामध्ये गेली नाही आणि तक्रारही केली नाही. आम्ही १० ऑक्टोबर २०१९ मध्ये विवाह केला आणि मुलीबरोबर राहात आहोत. आपल्याला आरोपीविरोधात कोणतीही तक्रार नाही व त्याविरोधात केस चालविण्याची इच्छा नाही. त्यानंतर मुलीच्या आईनेही सरकारी वकिलांना दिलेला पाठिंबा मागे घेतला. त्यावर न्यायालयाने मायलेकींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी