शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

‘अब आओ उडा दुंगा’; धमकावणाऱ्या 'टायगर'चा नांदेड पोलिसांनी केला एन्काऊंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:30 PM

नांदेडमध्ये पोलिसांनी केला शेरसिंघ ऊर्फ टायगरचा एन्काऊंटर

ठळक मुद्देशहरात करत असे गन पॉर्इंटवर लूट  बारड परिसरात आखाड्यावर थरार

नांदेड : शहरात दोन ठिकाणी गन पॉर्इंटवर लूट करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. तर फरार असलेल्या शेरसिंघ ऊर्फ टायगर याच्यासोबत झालेल्या चकमकीत शेरसिंघचा एन्काऊंटर करण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

बी़ के़ हॉलमधील इमारतीत असलेल्या मेट्रो शूजच्या दुकानात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोघे जण घुसले होते़ ग्राहक असतील म्हणून कर्मचाऱ्याने त्यांचे स्वागत केले़ यावेळी आरोपींनी हम रिंदा के आदमी है़ग़ल्ले मे के पैसे निकाल असे म्हणून कर्मचाऱ्याला दमदाटी केली़ यावेळी दुकानात तीन कर्मचारी होते़ तर व्यवस्थापक बाहेर गेले होते़ कॅश काऊंटरजवळ गेल्यानंतर आरोपीने आपल्याजवळील बंदूक काढून त्यात गोळ्या भरल्या़ ही बंदूक कर्मचाऱ्याच्या डोक्याला लावून गल्ल्यातील रोख २१ हजार रुपये काढून घेतले़ त्याचबरोबर महागडे बुट आणि इतर साहित्यही आरोपींनी घेतले़ घटनेनंतर आरोपींनी पळ काढला़ ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती़ या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती़ काही वेळातच व्यापाऱ्यांनी शटर डाऊन करीत या घटनेचा निषेध नोंदविला होता़ त्यानंतर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी तपासणी नाके लावले होते़ प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत होती़ त्यात रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप चौक परिसरात अजय उर्फ भोप्या राजकुमार ढगे (वय २१, रा़ सैलानीनगर ) हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला़ तर शेरसिंघ ऊर्फ टायगर हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. 

रविवारी रात्रीपासूनच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेरसिंघच्या मागावर होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास शेरसिंघ हा बारसगाव ते बारड दरम्यान एका आखाड्यावर असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पथकातील कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी शेरसिंघ हा झोपलेला होता. परंतु पोलीस आल्याची कुणकुण लागताच त्याने आपल्याकडील बंदूक काढून पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. तर प्रत्युत्तरात पोलिसांनी दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शेरसिंघच्या डाव्या खांद्याला लागली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर रुग्णालयात घेऊन येताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या वीस वर्षांहून अधिक काळानंतर नांदेडात एन्काऊंटर करण्याची ही पहिली घटना आहे. 

अर्ध्या तासापूर्वीच बिअर शॉपीत राडामेट्रो शूजची घटना घडण्यापूर्वी आरोपींनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नमस्कार चौक येथे असलेल्या बिअर शॉपीत राडा घातला होता़ या ठिकाणी शॉपीचालकाला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील ३० हजार रुपये काढून घेतले होते़ त्यानंतर आरोपींनी आपला मोर्चा श्रीनगर भागाकडे वळविला होता़ 

‘अब आओ उडा दुंगा’शेरसिंघ हा आखाड्यावर असताना पोलिसांनी त्याला घेरले होते. यावेळी त्याने आपल्याजवळील दारुची बाटली काढून अख्खी बाटली एकाच दमात रिचविली. त्यानंतर आपल्याजवळील बंदूक काढून पोलिसांच्या दिशेने रोखत अब आओ उडा दुंगा, अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांच्या दिशेने शेरसिंघने तीन गोळ्या झाडल्या.त्यानंतर प्रत्युत्तरात पोलिसांनी झाडलेल्या दोन गोळीपैकी एक गोळी शेरसिंघला लागली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडShootingगोळीबार