शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आ. रवींद्र वायकरांवर ईडीच्या धाडी; जोगेश्वरीतील हॉटेलप्रकरणी घरासह सात ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 06:05 IST

काय आहे प्रकरण? जाणून घेऊया

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जोगेश्वरी येथे बांधण्यात येणाऱ्या एका तारांकित हॉटेलच्या बांधकामाच्या परवानगीत झालेली अनियमितता आणि मनी लाँड्रिग झाल्याचा ठपका ठेवत ईडीने शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी धाडी टाकल्या.

सकाळी साडेसातपासून दुपारपर्यंत छापेमारीची कारवाई सुरू होती. यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी वायकर यांचा जबाब नोंदवला आहे. मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि वास्तुविशारद अरुण दुबे यांच्या निवासस्थानीही छापेमारी केल्याची माहिती आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे महानगरपालिकेत कार्यरत सब-इंजिनिअर संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती. याच आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या आधारे आता ईडी तपास करत आहे.

त्रिपक्षीय करार झाला असूनही वायकर यांनी त्याची माहिती लपवत नव्या विकास प्रणालीतील तरतुदींचा फायदा घेत साडेतीन लाख चौरस फुटांचे १४ मजली पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी पालिकेकडून घेतल्याचा आणि या प्रकरणात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अलीकडेच मुंबई महानगरपालिकेने या हॉटेलच्या बांधकामाची परवानगी रद्द केली आहे.

काय आहे प्रकरण?

 चित्रपट निर्माते कमाल अमरोही यांच्या स्टुडिओच्या भूखंडापैकी आठ हजार चौरस मीटर भूखंड वायकर व अन्य चौघांनी विकत घेतला होता. हा भूखंड मनोरंजन उद्यानासाठी आरक्षित होता. मात्र, १९९१ च्या विकास नियमावलीतील तरतुदीच्या आधारे या भूखंडाच्या मर्यादित विकासासाठी महल पिक्चर्स, वायकर व महापालिका यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता. या करारानुसार, या भूखंडावर वायकर ३३ टक्के विकास करू शकतात व उर्वरित ६७ टक्के सार्वजनिक वापरासाठी राखीव ठेवण्यात आली होती. या ३३ टक्क्यांमध्ये बॅडमिंटन हॉलकरिता परवानगी असूनही वायकर यांनी तेथे सुप्रिमो बॅन्क्वेट्स नावाने लग्नाचा हॉल सुरू केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयRavindra Waikarरवींद्र वायकर