शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 07:17 IST

उलवे परिसरात एक विदेशी नागरिक ड्रग्स पुरवठा तसेच विक्री करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.

नवी मुंबई : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने उलवे येथून १ कोटी २ लाख ५५ हजारांचे कोकेन हस्तगत केले आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून तो मूळचा पश्चिम आफ्रिकेचा आहे. राहत्या घरात हे ड्रग्स मिळून आले.

उलवे परिसरात एक विदेशी नागरिक ड्रग्स पुरवठा तसेच विक्री करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी सहायक निरीक्षक अलका पाटील, महेंद्र ठाकूर, शरद भरगुडे, शिरीष चव्हाण आदींचे पथक केले. 

या पथकाने उलवे परिसरात पाळत ठेवली असता सेक्टर २५ येथे राहणाऱ्या एका आफ्रिकन व्यक्तीच्या हालचालींवर संशय आला. यामुळे पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्याचा ड्रग्स विक्रीच्या रॅकेटशी संबंध असल्याचे स्पष्ट होताच सोमवारी दुपारी त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये  धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. 

ड्रग्स विक्रीचे रॅकेट समोर येणारया प्रकरणी जॉर्ज डॅसिल्व्हा (३५) याच्यावर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ३१ ऑक्टोबर पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामध्ये त्याच्याकडून ड्रग्स विक्रीतल्या इतर सहकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

४१० ग्रॅम कोकेनघर झडतीमध्ये त्याच्याकडील बॅगेत ४१० ग्रॅम कोकेन हा अमलीपदार्थ मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार १ कोटी २ लाख ५५ हजार रुपये त्याची किंमत आहे. हे ड्रग्स त्याने ग्राहकांना विक्रीसाठी बाळगल्याची कबुली दिली आहे; परंतु त्याला या ड्रग्सचा पुरवठा कोणी केला याची माहिती उघड होऊ शकलेली नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी