शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचा लैंगिक छळ काढणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून नागरिकांनी काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 14:32 IST

मनवेल पाड्याच्या सह्याद्री नगरमध्ये आरोपी शिक्षक प्रमोद मौर्या हा इशांत नावाचा खासगी ट्युशन क्लास चालवतो.

मंगेश कराळे

नालासोपारा :- खासगी ट्युशन क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप देऊन नागरिकांनी धिंड काढल्याची घटना बुधवारी सकाळी विरारच्या मनवेलपाडा परिसरात घडली आहे. विरार पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मनवेल पाड्याच्या सह्याद्री नगरमध्ये आरोपी शिक्षक प्रमोद मौर्या हा इशांत नावाचा खासगी ट्युशन क्लास चालवतो. यामध्ये त्याने ७ वी इयत्तेत शिकणाऱ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा मागील आठवड्यात लैंगिक छळ केल्याने ती घाबरून २ दिवस ट्युशनला गेली नाही. तिला घरच्यांनी ट्युशनला का जात नाही हे विचारल्यावर तिने घरच्यांना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर बुधवारी सकाळी मुलीचे पालक आणि परिसरातील संतप्त नागरिक ट्युशनमध्ये गेले व आरोपी शिक्षकाला मारहाण करून भर रस्त्यावरून त्याची धिंड काढली. या झालेल्या मारहाणीत आरोपी शिक्षक हा रक्तबंबाळ झाला होता. या शिक्षकाने ३ ते ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

ज्या मुलींचा या आरोपी शिक्षकाने लैंगिक छळ केला आहे त्या मुली घाबरतात. याची पोलिसांनी चौकशी करून आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आरती पडवळ या स्थानिक महिलेने केली आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. मुलांना शिक्षकांकडे शिकविण्यासाठी विश्वासने पाठवतो परंतु ते असा घृणास्पद प्रकार करत आहे. हा नागरिकांच्या संतपाचा उद्रेक होता. त्याला बेदम मारहाण करत धिंड काढल्याचे मनिष राऊत यांनी सांगितले.

नागरिकांनी आरोपी शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याने मुलीची छेड काढून लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. तिचा जबाब नोंदवत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

- विजय पवार, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी