शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपुरात सिनेस्टाईल हत्येचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 20:35 IST

कुख्यात गुन्हेगारांच्या एका टोळीने कटकारस्थान रचून प्रतिस्पर्ध्याची सिनेस्टाईल हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिस्पर्धी तरुणाच्या मित्रांनी प्रसंगावधान राखल्यामुळे भीषण हत्येचा गुन्हा टळला. २४ तासानंतर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे काही वेळासाठी पोलीसही हादरले.

ठळक मुद्देकुख्यात गुन्हेगारांसह चौघे ताब्यात : प्रतापनगरात दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुन्हेगारांच्या एका टोळीने कटकारस्थान रचून प्रतिस्पर्ध्याची सिनेस्टाईल हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिस्पर्धी तरुणाच्या मित्रांनी प्रसंगावधान राखल्यामुळे भीषण हत्येचा गुन्हा टळला. २४ तासानंतर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे काही वेळासाठी पोलीसही हादरले.निखिल ऊर्फ गोलू लालसिंग मलिये (वय ३०) असे गुन्हेगारांच्या तावडीतून वाचलेल्याचे नाव आहे. तर त्याच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींची नावे गणेश सुधाकर मेश्राम (रा. जयताळा), मनोज वैद्य, अजिंक्य दिनकर नवरे (रा. एकात्मता नगर) आणि भुºया ऊर्फ दिलीप भालचंद्र गाते अशी असून पोलिसांनी त्यांना शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले.गोलू मलिये हा भांगे विहारमध्ये राहतो. गेल्या वर्षी शेरा नामक कुख्यात गुंडाची हत्या झाली होती. त्यात गोलूला अटक करण्यात आली होती. तो कारागृहातून बाहेर आला. सध्या तो साई ट्रेडर्स नामक दुकान चालवतो. शेराची हत्या करणाºया आरोपींचा गेम करून आपली दहशत निर्माण करण्याचा कट कुख्यात गुंड गणेश मेश्राम याने रचला. त्यानुसार त्याने आपल्या सात ते आठ साथीदारांना सहभागी करून घेतले. कटानुसार त्याने गोलूकडे आरोपी अजिंक्य नवरे याला कार धुण्यासाठी काही दिवसांपूर्वी कामावर लावले. रोज सकाळी येऊन तो गोलूची कार धुवायचा. त्यामुळे त्याच्यावर गोलूचा विश्वास बसला होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास अजिंक्य गोलूकडे कार धुण्यासाठी आला. गोलू कारजवळ येताच अजिंक्यने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकले. धोका लक्षात आल्यामुळे गोलू लगेच कारमध्ये बसला. तेवढ्यात आरोपी मेश्राम आणि त्याचे साथीदार गोलूच्या कारकडे धावले. त्यांच्या हातात घातक शस्त्रे होती. त्यांनी कारची काच फोडून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. गोलूने आरडाओरड केल्यामुळे त्याचे मित्र धावून आले आणि त्यांनी आरोपींवर दगडफेक केली. एका आरोपीच्या डोक्याला दगड लागल्यामुळे आरोपी घाबरले आणि तेथून त्यांनी पळ काढला.या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. गोलू याने प्रतापनगर ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी वेगवेगळी पथके गुन्हेगारांच्या शोधासाठी कामी लावली. शुक्रवारी दुपारपासून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. गोलूकडे कार वॉशर म्हणून काम करणाºया आरोपी अजिंक्य नवरे याला ताब्यात घेताच त्याने या कटाचा सूत्रधार कुख्यात गुंड गणेश मेश्राम असल्याचे सांगितले. पोलिसांनी सायंकाळी मेश्रामलाही ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, मेश्रामने गोलू मलियेचा गेम करण्यासाठी महिन्याभरापूर्वीच कट रचला होता. या कटाचा एक भाग म्हणूनच त्याने अजिंक्य नवरे याला गोलूकडे कार वॉशिंगचे काम करण्यास सांगितले होते. नेहमीप्रमाणे सकाळी गोलू घराजवळ एकटाच असतो, हे आरोपींना माहीत होते. त्यामुळे त्याचा गेम करण्यासाठी अजिंक्यच्या सोबत मेश्राम आणि त्याचे सात ते आठ गुंड साथीदार आले. मात्र गोलूच्या मित्रांनी धोका ओळखून त्यांच्यावर दगडफेक केल्यामुळे भीषण हत्येची घटना टळली.बदला चुकविण्यासाठी कटकुख्यात मेश्राम आणि मनोज वैद्य या दोघांवर हत्या आणि इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गोलू मलियेची हत्या करून शेराच्या हत्येचा बदला चुकवायचा आणि परिसरात दहशत निर्माण करायची, असा आरोपींचा उद्देश होता. वृत्त लिहिस्तोवर त्यांच्या अटकेची प्रक्रिया प्रतापनगर ठाण्यात सुरू होती. पोलीस त्याच्या फरार साथीदारांचाही शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर