शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेट पाकिट सप्लायरला लुबाडणारी दुकली गजाआड, पानटपरीवालाही अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 22:36 IST

पानशॉपवाल्यांना सिगारेटची पाकिट पुरविणा-या सप्लायरला लुबाडणा-या दोघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली.

कल्याण:  

पानशॉपवाल्यांना सिगारेटची पाकिट पुरविणा-या सप्लायरला लुबाडणा-या दोघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. या दोघांनी चोरलेला माल खरेदी करणा-या एका पानटपरीवाल्याला देखील पकडण्यात आले आहे.

कल्याण पुर्वेतील मनीषा नगर कॉलनीत १५ जुलैला सकाळी १० वाजता सिगारेटची  पाकिट पानशॉपवाल्यांना पुरविणा-या व्यक्तीची नजर चूकवून त्याच्या गाडीवरील सिगारेटची पाकिट असलेली बॅग चोरून नेल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखा करीत होती. 

दरम्यान या गुन्हयातील आरोपींबाबत गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार विनोद  सोनवणे यांना खब-यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक आनंद रावराणे यांच्यासह हवालदार सोनवणे, बाप्पू जाधव, गोरक्षनाथ पोटे, अमोल बोरकर, पोलीस नाईक महेश साबळे, श्रीधर हुंडेकरी, सचिन वानखेडे, पोलीस शिपाई गोरक्ष शेकडे  मिथून राठोड, विजेंद्र नवसारे आदिंच्या पथकाने डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा पेट्रोल पंप लगत असलेल्या किराणा स्टोअर्स परिसरातून गणेश जळगावकर (वय २२) आणि प्रसाद राजगुरू (वय ३२ ) दोघेही रा. दिवा यांना शनिवारी संध्याकाळी ५ वाजता सापळा लावून अटक केली. 

त्यांच्याकडे चौकशी करता कल्याण पूर्वेत सिगारेटची पाकिट असलेली बॅग चोरून नेल्याची कबुली त्यांनी दिली. चोरलेली सिगारेटची पाकिटे त्यांनी ओळखीचा पानटपरीवाला अच्छेलाल साकेत (वय २७) रा. दिवा याला विकली होती हे देखील तपासात उघड झाले. त्यालाही संध्याकाळी साडेसहा वाजता दिवा येथील मंगल मार्केट परिसरातून अटक केली. त्याच्याही चौकशीत जळगावकर आणि राजगुरू यांच्याकडून चोरीची सिगारेटची पाकिटे कमी किमतीत विकत घेतल्याचे समोर आले. या आरोपींनी मागील महिन्यात  कल्याण पूर्वेतील चेतना स्कूल परिसरात तर सात दिवसांपुर्वी डोंबिवलीतील सोनारपाडा तसेच दिड महिन्यापुर्वी सागाव आणि शिळ डायघर परिसरात सिगारेटची पाकिटे असलेली बॅग चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्हयात त्यांनी दुचाकीचा देखील वापर केला आहे ती देखील जप्त करण्यात आली आहे अशी माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक शिरसाठ यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी