शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंग यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे? सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 08:46 IST

Parambir Singh : या प्रकरणातील सहआरोपी व परमबीर यांचा निकटवर्तीय संजय पुनमिया याने राज्य सरकारमधील बड्या मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशी व सरकार पाडण्याचा कट रचल्याचा तसेच परमबीर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा तक्रारदाराचा दावा आहे.

- जमीर काझी

मुंबई :  ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. भाईंदर येथील बिल्डर श्यामसुंदर अग्रवालकडून कोट्यवधींची रोकड व स्थावर मालमत्ता बळकावल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात येणार आहे. 

या प्रकरणातील सहआरोपी व परमबीर यांचा निकटवर्तीय संजय पुनमिया याने राज्य सरकारमधील बड्या मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशी व सरकार पाडण्याचा कट रचल्याचा तसेच परमबीर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा तक्रारदाराचा दावा आहे. त्यामुळे सखोल तपास करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सीआयडीकडे गुन्हा हस्तांतरणाची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण केली जाणार आहे, असे अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपी असल्याने अग्रवाल याच्या तक्रारीनुसार २१ जुलैला परमबीर यांचे निकटवर्तीय पुनामिया, सुनील जैन, उपायुक्त अकबर पठाण, एसीपी श्रीकांत शिंदे, वरिष्ठ निरीक्षक आशा कोकरे, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयुक्त हेमंत नगराळे यांनी एसआयटी नेमली होती. उपायुक्त निमित गोयल यांच्या नेतृत्वाखाली व तपास अधिकारी एसीपी एम. एम. मुजावर यांच्यासह ७ अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश होता. मात्र हे प्रकरण गुंतागुंतीचे आणि त्याला राजकीय व अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याने सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांच्या भ्रष्ट व गैर कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्या असल्या तरी आतापर्यंत केवळ चार गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक सीआयडी व दोन ठाणे आयुक्तालयाकडे आहेत. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल गुन्हाही सीआयडीकडे वर्ग होईल.

अकबर पठाण यांना न्यायालयाचा दिलासाप्राथमिक चौकशी न करता आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने उपायुक्त अकबर पठाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याला बळीचा बकरा बनविल्याचा दावा त्यांनी केला असून, यावरील पुढील सुनावणी २५ ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई न करण्याची सूचना न्यायालयाने पोलिसांना केली आहे.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMaharashtraमहाराष्ट्र