शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटचा स्पीड होता कमी! संतप्त व्यक्तीने असे कृत्य केले, ज्यामुळे 4,000 घरांतील इंटरनेट झाले ठप्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 15:34 IST

China : आता या व्यक्तीला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बीजिंग: इंटरनेट प्रोव्हायडर कंपन्यांचे दावे आणि वास्तव यात मोठा फरक आहे. म्हणजे कंपन्या ज्या स्पीडचा (Internet Speed) दावा करतात, तितका स्पीड सहसा लोकांना मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेकवेळा लोक नाराज होऊन प्रोव्हायडर बदलत राहतात, पण चीनमध्ये एका व्यक्तीने असे काही केले ज्यामुळे एकच खळबळ उडाली. आता या व्यक्तीला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, हा व्यक्ती एका इंटरनेट कॅफेमध्ये गेला होता, याठिकाणी इंटरनेटचे स्पीड खराब मिळत असल्याने, त्याने संतप्त होऊन इंटरनेट केबललाच आग लावली.

चिनी अधिकार्‍यांनी सांगितले की, लॅन असे टोपणनाव असलेल्या व्यक्तीला कमी स्पीडच्या इंटरनेट कनेक्शनमुळे संतप्त होऊन इंटरनेट उपकरणांना आग लावल्याप्ररकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लॅनने गेल्या वर्षी जूनमध्ये दक्षिण गुआंग्शी प्रांतातील एका इंटरनेट कॅफेला भेट दिली होती. खराब इंटरनेट स्पीडमुळे तो अस्वस्थ झाला आणि त्याने तेथे असलेल्या केबल्स आणि इतर उपकरणे जाळून टाकली.

जवळपास 50 तास इंटरनेट ठप्पखटल्याच्या सुनावणीदरम्यान अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, खराब इंटरनेटमुळे लॅन इतका संतापला की त्याने ऑप्टिकल फायबर नेटवर्क केबल असलेला सार्वजनिक बॉक्स नष्ट केला. त्याने पेपर नॅपकिन पेटवण्यासाठी लायटरचा वापर केला आणि नंतर टेलिकॉम बॉक्सला आग लावली. आगीमुळे, सार्वजनिक रुग्णालयासह सुमारे 4,000 घरे आणि कार्यालयांमध्ये 28 ते 50 तास इंटरनेट ठप्प झाले.  या घटनेनंतर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या लायटरसह  लॅनला अटक केली. सार्वजनिक दूरसंचार सुविधांचे नुकसान केल्याप्रकरणी लॅनला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेची चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर खूप चर्चा होत आहे. 

टॅग्स :Internetइंटरनेटchinaचीन