शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलांनीच केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 15:48 IST

लातूर जिल्ह्यातील घटना : दोघांवर गुन्हा ; गळा आवळून टाकले शेतात

बेलकुंड (जि. लातूर) : वडील दारू पिऊन घरात भांडण करुन आईला सतत मारहाण करीत असल्याचा राग मनात धरून शिंदाळावाडी (ता.औसा) येथील दोघा भावांनी वडिलांचा खून केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी कृष्णा मच्छिंद्र गरड  व त्याच्या भावावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, शिंदाळावाडी शिवारातील योगिता गरड यांच्या शेतात मच्छिंद्र काशीनाथ गरड (वय ४३) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला.  काही वेळानंतर याची चर्चा गावात सुरू झाली. या घटनेची माहिती भादा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मयताच्या गळ्याला व मानेवर, डोळ्यावर जखमा आढळून आल्या. सदर व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात मयताचे वडील काशिनाथ गरड यांच्या फिर्यादीवरून कृष्णा मच्छिंद्र गरड याच्यासह भावावर कलम ३०२, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीlaturलातूर