नालासोपारा - २३ मार्च २०१९ ते ८ मे २०१९ दरम्यान १६ आरोपींनी चाईल्ड पोर्नोग्राफी (मॅन्युफ्रेक्चर अँड डिस्ट्रिब्युटर) असलेले साहित्य फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून वायरल केले म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुपेंद्र टेलर (38) यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार देऊन अज्ञात आरोपी विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 67 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
हे काय? अमरावतीतही चाईल्ड पोर्नोग्राफी
फेसबुकवरून अल्पवयीन मुलांचे लैंगिक साहित्य प्रसारित केलेल्या नऊ अश्लील व्हिडीओ नालासोपारा तुळिंज पोलिसांनी जप्त केले आहेत. ज्यांच्या नावे ‘आयपी’ (इंटरनेट प्रोटोकॉल) अॅड्रेस आहेत, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. व्यावसायिक वापरासाठी लहान मुलांचा वापर करून हे अश्लील व्हिडीओ तयार केले गेल्याचे प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पालघर जिल्ह्य़ातील वसई-विरारमधील १७ आयपी अॅड्रेसवरून लहान मुलांचे लैंगिक शोषण (चाईल्ड पोर्नोग्राफी) करण्यात येत होते. हे सर्व ‘आयपी अॅड्रेस’ची वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये नोंद करण्यात आली आहे.