शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नसल्याच्या बहाण्याने बाल सुधारगृहाचे गेट तोडून पळून गेलेल्या बालकैद्यांचा अद्याप सुगावा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 21:20 IST

सुरक्षारक्षकाची प्रकृती चिंताजनक आहे. या अत्याचार करणाऱ्यांनी खोलीत पाणी नसल्याच्या बहाण्याने गेट उघडले आणि नंतर मुख्य गेटचे कुलूप तोडून पळ काढला.

इंदूर -  इंदूरच्या हिरानगर भागात असलेल्या विशेष गृह युनिट बाल सुधारगृहातून पळून गेलेल्या सात विधी संघर्ष बालकांचा अद्याप शोध लागलेला नाही. पळून जाण्यापूर्वी सर्वांनी वॉचमन आणि गार्डला मारहाण केली. सुरक्षारक्षकाची प्रकृती चिंताजनक आहे. या अत्याचार करणाऱ्यांनी खोलीत पाणी नसल्याच्या बहाण्याने गेट उघडले आणि नंतर मुख्य गेटचे कुलूप तोडून पळ काढला.चिल्ड्रन युनिट होमच्या माहितीवरून हिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या बालकांना पकडण्यासाठी तपास सुरू केला, मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. एका गुन्हेगाराने चौकीदार सचदेव यांना खोलीतील पाणी संपल्याचे सांगितले होते. ते मान्य करत सचदेव यांनी गेट उघडले. त्यानंतर आतून घातपाती हल्ला करणारे बाकीचे विधी संघर्ष बालक बाहेर आले, या सर्वांनी मिळून सचदेव यांना मारहाण केली. त्याला ओलीस ठेवण्यात आले, आवाज ऐकून सुरक्षारक्षक अब्दुल तेथे पोहोचला, त्यानंतर बालकांनी त्याच्यावरही हल्ला केला, यात अब्दुल जखमी झाला आणि सातही विधी संघर्ष बालक घटनास्थळावरून पळून गेले.अनेक जिल्ह्यांत पोलिसांचा इशारापळून गेलेले सर्व बालकैदी १८ ते २१ वयोगटातील आहेत. हे सर्व भिंड, ग्वाल्हेर, उज्जैन आणि भोपाळ येथील आहेत. सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यावरील खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. पोलिसांनी या शहरांच्या पोलिसांनाही सतर्क केले आहे. मात्र, 20 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पोलिसांचे हात रिकामे आहेत. कोणताही महत्त्वाचा सुगावा सापडला नाही.

गुन्हा नोंदवून तपास सुरू करायाआधीही अनेक बाल कैदी येथून पसार झाले आहेत. असे असूनही, बाल सुधारगृहात कोणतीही चांगली सुरक्षा व्यवस्था नाही. कधी खिडकी फोडून तर कधी सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा देऊन ते पळून गेले आहेत. बालसुधारगृहातून आलेल्या तक्रारीनंतर हिरा नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :PrisonतुरुंगMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस