शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीनं गळा कापला अन् शीर हातात घेऊन गावभर फिरला; क्रूर दृश्य पाहून संपूर्ण जिल्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 20:05 IST

खून करून गुन्हेगार तोंडात गुटखा चघळत होता तसेच जोरजोरात हसत होता असं गावकऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे हे खतरनाक दृश्य पाहून गावातील प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण झाली.हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले

छत्तीसगडच्या गरियाबंद येथे क्रूर हत्येचा भयानक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका आरोपानं कुऱ्हाडीने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर वार केले. इतकेच नाही तर शीर धडापासून वेगळं करून टाकलं. त्यानंतरही या आरोपीचा राग शांत झाला नाही. त्याने मृत व्यक्तीचं धडापासून वेगळं झालेलं शीर आणि रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन संपूर्ण गावभर फिरत राहिला. हे दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालं.

गावातील ज्या ज्या लोकांनी हे दृश्य पाहिलं ते थरथर कापत होते. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, यावेळी खून करून गुन्हेगार तोंडात गुटखा चघळत होता तसेच जोरजोरात हसत होता. हे दृश्य उपस्थित असणाऱ्या एकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे खतरनाक दृश्य पाहून गावातील प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण झाली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. स्थानिकांच्या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. ही घटना गरियाबंदच्या छुरा पोलीस ठाणे हद्दीतील कोठी गावातील आहे. एका क्षुल्लक कारणावरून आरोपीने शेजारी राहणाऱ्या इसमाची हत्या केली. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. मृतकाच्या शेतात आरोपीचा पाळीव डुक्कर घुसून भाज्यांचे नुकसान करत होता. मृत व्यक्तीने अनेकदा याबाबत आरोपीसमोर नाराजी व्यक्त केली.

या दोघांमधील वाद वाढला त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात कुऱ्हाडीनं जल्लादाप्रमाणे त्या वृद्ध व्यक्तीचा गळा कापून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपी मृत व्यक्तीचं शीर घेऊन गावभर हिंडत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाबाबत अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुखनंदन राठोड म्हणाले की, दोघांमध्ये वादविवाद सुरू होता. त्यानंतर आरोपी माधवनं करम नावाच्या वृद्ध व्यक्तीची कुऱ्हाडीने गळा कापून हत्या केली. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. या घटनेनंतर गावात शांतता पसरली आहे. लोकांच्या मनात दहशत आहे. अचानक घडलेल्या या प्रकारानं सगळेच भयभीत आहेत. एका क्षुल्लक कारणावरून कुणी अशाप्रकारे क्रूर हत्या का करू शकतो? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

नक्षलग्रस्त भागात हे गाव असल्याने पोलिसांनी सकाळी मृतदेहाचं पोस्टमोर्टम करून त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर माथेफिरू युवक कापलेलं शीर हातात घेऊन २० किमी पायी चालला. माथेफिरूनं रागाच्या भरातून वृद्ध व्यक्तीची कुऱ्हाडीनं गळा कापला होता.

टॅग्स :Policeपोलिस