शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

यूट्यूबवर पाहून बनवला बॉम्ब अन् पत्नीच्या बॉसची उडवली कार; आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 10:24 IST

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. 

छत्तीसगडमधील दुर्ग येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या बॉसची कार बॉम्बने उडवून दिली. पत्नीचे तिच्या बॉससोबत अफेअर सुरु आहे, असा संशय आरोपी व्यक्तीला होता. त्यामुळे त्याने रिमोट कंट्रोल बॉम्ब बनवला आणि पत्नीच्या बॉसची कार उडवून दिली. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली. 

मिळालेल्या माहितानुसार,  दुर्ग पोलिसांनी देवेंद्र सिंग (४०) नावाच्या आरोपीला अटक केली. देवेंद्रने त्याच्या पत्नीच्या बॉसची कार रिमोट कंट्रोल बॉम्बने उडवून दिली. सुदैवाने, बॉम्बस्फोटावेळी कारमध्ये कोणीही नव्हते. जर कारमध्ये कोणी असते, तर मोठी दुर्घटना घडली असती. पोलिस चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की त्याने यूट्यूबवर पाहून बॉम्ब बनवला होता.

या प्रकरणाची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भिलाई शहरातील रिअल इस्टेट व्यावसायिक संजय बुंदेला यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये अचानक स्फोट झाला. पोलिसांनी या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यावेळी एका आरोपीची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. 

आरोपी देवेंद्रने सांगितले की, त्याला संशय होता की त्याची पत्नी आणि बॉस संजय बुंदेला यांचे अफेअर सुरु आहे. त्यामळे त्याने रिमोट कंट्रोल बॉम्बने कार उडवून दिली. दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरुद्ध नवीन फौजदारी कायदा बीएनएस आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोनही जप्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड