शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:06 IST

हे नवविवाहित जोडपे अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबाला सतत चिंता सतावत आहे. या दोघांच्या घरी सगळेच चिंतेत आहेत

खैरागड - छत्तीसगडच्या खैरागड गंडई जिल्ह्यात एक नवविवाहित जोडपे सासरी जाताना अचानक बेपत्ता झाले आहे. २८ वर्षीय नरेंद्र वर्मा आणि २५ वर्षीय ट्विंकल वर्मा यांचे अलीकडेच अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लग्न झाले होते. दोघेही १४ जून रोजी चकनार इथल्या मुलीच्या माहेरी निघाले होते. परंतु तिथे पोहचलेच नाही. नातेवाईकांनी १७ जून रोजी या दोघांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली. या दोघांचेही मोबाईल बंद आहेत त्यामुळे त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकत नाही. याबाबत पोलिसांनी मोबाईल फोन ट्रेस करणे सुरू केले आहे. ज्याठिकाणाहून ते बेपत्ता झालेत तिथेही सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. नवविवाहित जोडपे बेपत्ता झाल्याने कुटुंबाला मोठी चिंता सतावली आहे.

माहितीनुसार, १४ जून रोजी या दोघांसोबत अखेरचे बोलणे झाले होते. तेव्हापासून दोघांचा नंबर बंद आहे. काहीच संपर्क नाही. ट्विंकलचे वडील चतुर्भुज जंघेल यांनी म्हटलं की, ते दोघे घरी पोहचल्यावर फोन करतील असं आम्हाला वाटत होते परंतु खूप तास झाले तरी त्यांचा फोन आला नाही त्यामुळे चिंता लागली. तर १७ जून रोजी छुईखदान पोलीस स्टेशनला बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली आहे असं नरेंद्रच्या वडिलांनी सांगितले. या दोघांचे मोबाईल पोलिसांकडून ट्रेस केले जात आहेत. 

हे नवविवाहित जोडपे अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबाला सतत चिंता सतावत आहे. या दोघांच्या घरी सगळेच चिंतेत आहेत. नरेंद्र आणि ट्विंकल यांच्या लग्नाला आता काहीच दिवस झालेत. त्यानंतर हा त्यांचा पहिला प्रवास होता. अखेर १४ जूनला काय झाले, ते एखाद्या अडचणीत सापडलेत का की अन्य काही कट आहे हे प्रश्न कुटुंबाला सतावू लागले आहेत. सध्या पोलीस प्रत्येक अँगलने या घटनेचा तपास करत आहे परंतु अद्याप कुठलाही ठोस पुरावा हाती लागला नाही. 

सोनम-राजा प्रकरणानं दहशत

मागील काही दिवसांपासून देशात सोनम आणि राजा रघुवंशी प्रकरण सतत चर्चेत आहे. या प्रकरणात सोनम-राजा लग्नानंतर काही दिवसांत हनीमूनसाठी मेघालयला गेले होते परंतु २३ मे पासून हे जोडपे अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जूनच्या आसपास राजा रघुवंशी याचा मृतदेह एका खोल दरीत सापडला होता. त्यानंतर या प्रकरणी सोनम रघुवंशीने सरेंडर करताच सगळा प्रकार उघडकीस आला. सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून राजा रघुवंशीची हत्या केल्याचे समोर आले. राजाची हत्या करण्यासाठी सोनम आणि राजने तीन मित्रांना सुपारी दिली होती. त्यानंतर मेघालयात राजा रघुवंशीला एकटे गाठून सोनम आणि तिघांनी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून ते फरार झाले. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे येत आहेत. त्यातच छत्तीसगडमधील हे नवविवाहित जोडपे बेपत्ता झाल्याने अनेकांच्या मनात दहशत पसरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं