शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! उधारीच्या बदल्यात २ बहिणींनी दुकानदाराला करू दिला स्वत:च्याच मुलींवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 15:49 IST

तंबाखूची विक्री करत असल्यानं पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून समोर आली धक्कादायक माहिती

चेन्नई: आई आपल्या मुलांना जीवापाड जपते, त्यांची काळजी घेते, असं आपण अनेकदा ऐकतो. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हणतात. मात्र काहीवेळा काही महिला या सगळ्याला काळिमा फासतात. माय लेकराच्या नात्यालाच धक्का लावतात. चेन्नईत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. दुकानातून सामान घेण्याच्या बदल्यात दोन बहिणींनी दुकानदाराला आपल्याच मुलींवर बलात्कार करण्याची आणि त्याचं व्हिडीओ चित्रीकरण करण्याची परवानगी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस तपासात दुकानदाराच्या मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलींचे ५० अश्लिल व्हिडीओ सापडले.

२ महिलांनी करू दिला ५ मुलींवर बलात्कारटाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी ४८ वर्षांच्या दुकानदाराला अटक केली आहे. त्याचं नाव पेरुमल आहे. घरात लागणाऱ्या सामानाच्या बदल्यात दोन बहिणींनी स्वत:च्यावर अल्पवयीनं मुलींवर बलात्कार करण्याची परवानगी पेरुमलला दिली होती. त्यांनी पेरुमलला चित्रीकरण करण्याची परवानगीदेखील दिली होती. दोन बहिणींनी स्वत:च्या मुलींसोबतच त्यांच्या तीन मैत्रिणींवरही बलात्कार घडवून आणला. जीन्सवर पिवळा पेंट लावून विमानतळावर उतरला; अधिकाऱ्यांना संशय आला अन् मग...

प्रकरणाला कशी फुटली वाचा?दुकानदारानं बलात्काराचे व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये चित्रित केले. त्यातूनच ही घटना उघडकीस आली. बंदी घालण्यात आलेला तंबाखू त्याच्या दुकानात विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दुकानावर छापा टाकला. पोलिसांनी तंबाखूसोबतच पेरुमलचा मोबाईल जप्त केला. मोबाईलच्या तपासणीत पोलिसांना अल्पवयीन मुलींसोबत करण्यात आलेल्या कृष्णकृत्यांचे व्हिडीओ सापडले.

मोबाईलमध्ये सापडले ५० व्हिडीओपेरुमलनं अश्लील व्हिडीओ इंटरनेटवरून डाऊनलोड केले असावेत, असं पोलिसांना वाटलं. मात्र त्यांनी व्हिडीओ नीट पाहताच पेरुमलचं भांडं फुटलं. अश्लील व्हिडीओंमध्ये पेरुमलच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पेरुमलला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. त्यानंतर पेरुमल पोपटासारखा बोलू लावला. गेल्या ६ महिन्यांत ५ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची कबुली त्यानं पोलिसांकडे दिली. यानंतर पेरुमलविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याशिवाय आरोपी बहिणींवरदेखील गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.