शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

होळीनिमित्त कॅशबॅक ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक, सरकारकडून अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:16 IST

Cyber Crime : सध्या फसवणूक करणारे लोक अशा आकर्षक ऑफर्स देऊन लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारची रोकड देण्याचे आमिष दाखवून लिंक पाठवतात.

नवी दिल्ली : सध्याच्या काळात बँकेशी संबंधित कामे आणि व्यवहार खूप सोपे झाले आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसून करू शकता. मात्र सध्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अनेक घोटाळेबाज कॅशबॅकच्या नावाखाली फसवणूक करतात, त्याबाबत सरकारने अलर्ट जारी केला आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सायबर दोस्त या ट्विटर हँडलने याबाबत अनेक ट्विट केले आहेत.

"आनंदी आणि सायबर सुरक्षित 'होळी' सण साजरा करा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनव्हेरिफाइड पोस्ट किंवा न्यूज शेअर किंवा फॉरवर्ड करू नका. सावध राहा आणि सायबर सुरक्षित राहा", असे सायबर दोस्तने ट्विट करत म्हटले आहे. तसेच, आणखी एका ट्विटमध्ये सायबर दोस्तने म्हटले आहे की, 'यूपीआय अॅपद्वारे पेमेंट करण्याची ऑफर देणाऱ्या डिस्काउंट कूपन, कॅशबॅक आणि फेस्टिव्हल कूपनशी संबंधित सोशल मीडियावरील विविध फसव्या आकर्षक जाहिरातींपासून सावध राहा. सावध राहा आणि सायबर सुरक्षित राहा."

दरम्यान, सध्या फसवणूक करणारे लोक अशा आकर्षक ऑफर्स देऊन लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारची रोकड देण्याचे आमिष दाखवून लिंक पाठवतात. या लिंकद्वारे, ते तुम्हाला लॉटरी किंवा कॅशबॅक पाठवण्यासाठी तुमचा पिन विचारतात. तुम्ही या लिंकवर पिन टाकताच ते तुमच्या खात्यातील सर्व पैसे काढून घेतात. अशा परिस्थितीत, अशी कोणतीही लिंक उघडू नका आणि ती लवकरात लवकर डिलीट करा.

तुमचे बँकिंग डिटेल्स शेअर करू नकाअनेक वेळा सायबर गुन्हेगार तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्सच्या नावाने कॉल करतात. यानंतर, ते तुमच्याकडून तुमचे बँकिंग डिटेल्स, यूपीआय पिन इत्यादी माहिती घेतात. त्यानंतर ते तुमचे खाते रिकामे करतात. अशा परिस्थितीत, तुम्ही अशा कोणत्याही कॉलच्या फंदात पडू नका आणि कोणत्याही स्थितीत तुमचे बँकिंग डिटेल्स शेअर करू नका.

बँकिंग फसवणुकीशी संबंधित प्रकरणे सरकारी आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात देशात इंटरनेट बँकिंग फसवणुकीशी संबंधित 69818 प्रकरणे नोंदवली गेली. याशिवाय, याआधी 2019-20 या आर्थिक वर्षात 73552 फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली होती. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या या आकडेवारीत यूपीआय, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित बाबींचाही समावेश आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमHoliहोळी 2022