शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून पैसे काढताना गृहिणीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 10:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या गृहिणीला मदत करण्याचे सांगत हात चलाखीने तिचे एटीएम चोरून ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या गृहिणीला मदत करण्याचे सांगत हात चलाखीने तिचे एटीएम चोरून बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रकार जोगेश्वरी पश्चिम येथे घडला. तिने ओशिवरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

माधुरी यादव (३८) ही जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका नामांकित बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेली. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने ती आतमध्येच थांबली. काही वेळाने एक व्यक्ती तेथे आला. लवकर करा, उशीर होत आहे, असे बोलत त्याने मशीनची बटणे दाबायला सुरुवात केली आणि यादव हिचे कार्ड काढून दुसरेच कार्ड पुन्हा मशीनमध्ये टाकले. 

 पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे ती व्यक्ती बोलू लागल्याने ती तेथून निघाली. ती दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये गेली.  मात्र, तेथे पैसे निघाले नाही. तिने कार्ड तपासले असता तिचे कार्ड बदलण्यात आल्याचे लक्षात आले.  ती पुन्हा आधीच्या एटीएम सेंटरमध्ये गेली. तेथे कोणीच नव्हते.  काही वेळाने बँक खात्यातून तीन वेळा एटीएमद्वारे २५ हजार रुपये काढल्याचा मेसेज तिच्या पतीला आला. हातचलाखीने भामट्याने कार्ड चोरून पैसे काढल्याची तक्रार यादव हिने ओशिवरा पोलिसांत केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :atmएटीएम