शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा ३ हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून २२ जणांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 18:30 IST

Crime News Buldhana बंगलाेर येथील रिदास इंडिया प्राॅपर्टीज कंपनीच्या दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा : ५० हजार रुपये जमा केल्यास प्रत्येक महिन्याला २,६५० ते ३,१२५ रुपये देण्याचे आमिष दाखवून तब्बल २२ जणांची फसवणूक केल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी बंगलाेर येथील रिदास इंडिया प्राॅपर्टीज कंपनीच्या दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रिदास इंडिया प्रॉपर्टीज कंपनी बंगलोर शाखा औरंगाबाद या कंपनीने दाेन वर्तमानपत्रांमध्ये ५० हजार रुपये सदर कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला २,६५० ते ३,१२५ रुपये नफ्यापोटी परतावा मिळेल, अशी जाहिरात दिली हाेती. तसेच मूळ रक्‍कम परत पाहिजे असल्यास ४० दिवसात रक्‍कम परत मिळेल. तसेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रोडटच प्लॉट पाहिजे असल्यास स्वस्त दरात मिळेल, असेही जाहिरातीत म्हटले हाेते. बुलडाणा शहरातील म. साजीद अबुल हसन देशमुख यांनी या कंपनीमध्ये स्वत:चे व नातेवाईकांचे ११ लाख ५० हजार रुपये गुंतविले हाेते. रिदास इंडिया प्राॅपर्टीज कंपनीने काही महिने परतावा नियमित दिला. त्यानंतर मात्र परतावा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे माे. साजीद यांनी बुलडाणा शहर पाेलिसात तक्रार दिली हाेती. त्यावरून रिदास इंडिया प्राॅपर्टीज कंपनीचे डायरेक्टर आराेपी अयुब हुसेन व अनिस आयमन रा. बंगलाेर यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला हाेता. बुलडाणा शहर पाेलिसांनी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले हाेते. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे रिदास इंडिया प्राॅपर्टीज कंपनीविराेधात तक्रारी केल्या आहेत. जिल्ह्यातील आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणूक झालेली असल्यास अशा व्यक्तींनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रिदास इंडिया प्रॉपर्टी कंपनी शाखा औरंगाबादच्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन पाेलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक कैलास राहाणे यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी