शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करणे बेतले जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 19:50 IST

पतीने केली पत्नीची हत्या : अंधेरीतील घटना

ठळक मुद्देअंधेरी पूर्वच्या कामगार रुग्णालय वसाहतीत चौगुले हा आई, वडील व त्याची पत्नी आरती (२२) यांच्यासोबत राहत होता.त्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

मुंबई - पत्नी सतत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत असल्याच्या रागात पतीने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीत उघडकीस आला. पती चेतन चौगुले (३३) याला या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनीअटक केली.अंधेरी पूर्वच्या कामगार रुग्णालय वसाहतीत चौगुले हा आई, वडील व त्याची पत्नी आरती (२२) यांच्यासोबत राहत होता. तीन वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आहे. चौगुले गेले अनेक महिने बेरोजगार होता. आर्थिक कारणावरून तसेच आरती सतत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडण होत असे. या भांडणाला कंटाळून त्याची आई काही दिवसांपूर्वी नातेवाइकांकडे निघून गेली होती.बुधवारी आरतीने त्याच्याकडे खर्चासाठी पैसे मागितले. त्याने ते देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्या रात्री चौगुलेचे वडील बाहेर झोपले तर बाळासह हे जोडपे आतल्या खोलीत झोपले. चौगुलेला रात्री जाग आली. तेव्हा एवढ्या रात्रीही आरती मोबाइलवर काहीतरी करीत असल्याचे त्याने पाहिले. ती व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग करीत असल्याच्या रागातून त्याने जवळच पडलेल्या नायलॉन दोरीने तिचा गळा आवळला.राग शांत झाल्यावर त्याने तिला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच प्रयत्न करूनही ती उठली नाही. तेव्हा त्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरतीला रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चौगुलेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक