शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पायांच्या ठशांवरून दानपेटी चोर जेरबंद; देवीच्या मंदिरामध्ये केली होती चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 05:33 IST

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हा चेहऱ्याला काळे कापड बांधून अंगावर फक्त हाफ पॅन्ट व दानपेटी घेऊन जाताना दिसत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : खरोशी येथील केळंबा देवीची दानपेटी चोरी करून जामिनावर सुटलेल्या चोरट्याने पनवेल तालुक्यातील आपटाफाटा येथील मंदिरात १ ऑक्टोबर रोजी चोरी केली होती. त्याला चिखलाने माखलेल्या पायाच्या ठशांवरून अटक केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांनी शनिवारी दिली.

१ ऑक्टोबर रोजी स्वामी समर्थ मंदिर, साई हरिक्षेत्र, आपटाफाटा या मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा तोडून आतील स्टीलची दानपेटी चोरून बाहेरील संगमरवराची दानपेटी तोडून त्यातील भाविकांनी दान केलेली रोख रक्कम घरफोडी करून नेली होती, तसेच बाजूला राहणारे मंदिराचे विश्वस्त अंजली मिलिंद मुणगेकर यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले देवीचे वापरातील ५ तोळे वजनाचे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने घरफोडी चोरी करून नेल्याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे व पथकाने सुरू केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी हा चेहऱ्याला काळे कापड बांधून अंगावर फक्त हाफ पॅन्ट व दानपेटी घेऊन जाताना दिसत होता. तो नदीकिनारी असलेल्या चिखलातून गेल्यामुळे आरोपीच्या डाव्या पायाच्या ठळक पाऊलखुणा दिसत होत्या व उजव्या पायाचे पाऊलखुणा स्पष्ट दिसत नव्हत्या. यावरून आरोपी हा एका पायाने लंगडत चालणारा असावा व मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत नसल्याने तो नदी पार करून पलीकडील पेण तालुक्यातील आदिवासी पाड्याच्या दिशेने गेला असावा असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. 

यावरून गुप्त बातमीदारामार्फत पेण तालुक्यातील आदिवासी पाडे, तसेच इतर परिसरात अशा वर्णनाचा व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला असता खैरासवाडी, पो. जिते, ता. पेण, येथे अशा वर्णनाची एक व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली; परंतु तो सध्या पेण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक असल्याचे समजले. 

दागिने, रक्कम जप्तयाबाबत पेण पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी अभिलेख तपासता ही व्यक्ती दोन दिवसांपूर्वी कारागृहातून सुटल्याची माहिती मिळाली. तो एका पायाने लंगडत चालत असल्याचे पेण पोलिसांकडून कळाले. यावरून गुन्हा त्यानेच केला असल्याची खात्री झाल्याने त्याच्या राहत्या घराच्या परिसरात सापळा लावून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.  चौकशीत गुन्हा केल्याची कबुली दिली. गुरुनाथ तुकाराम वाघमारे, रा. खैरासवाडी, पो. जिते, पेण असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून  घरफोडी करून नेलेले ५० ग्रॅम वजनाचे दोन लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने, तसेच पाच हजार रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

टॅग्स :panvelपनवेल