शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका; १५ शहरांत हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 22:36 IST

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होऊ शकतो दहशतवादी हल्ला 

ठळक मुद्दे विशेषतः नवी दिल्लीतील लाल किल्ला मुख्यत्वेकरून दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी मिळाली आहे.दहशतवादी आयईडी, सरकारी गाडी किंवा गणवेश याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. 

मुंबई - नरेंद्र मोदी सरकारने कलम ३७० हटवल्याने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह, दिल्ली, पंजाब यासारख्या मोठ्या शहरात येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. विशेषतः नवी दिल्लीतील लाल किल्ला मुख्यत्वेकरून दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी मिळाली आहे. याठिकाणी दहशतवादी आयईडी, सरकारी गाडी किंवा गणवेश याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह नवी दिल्ली आणि इतर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

उद्या १२ ऑगस्टला बकरी ईद आणि त्यानंतर १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असे देशात दोन मोठे सण आहेत. याच पार्श्वभूमीवर हा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. होणाऱ्या संभाव्य हल्ल्यामुळे तपास यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर देशातील १५ मोठ्या शहरांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कलम ३७० हटवल्याने काश्मीर, पूर्वोत्तर भारतातील शहरे ही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याने काश्मीरमध्ये सध्या अशांतता पसरली आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि सर्व परिस्थितीची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल काश्मीर दौऱ्यावर आहेत. आयबीच्या इशाऱ्यानंतर पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राजधानी दिल्लीत 'जैश - ए- मोहम्मद' ही दहशतवादी संघटना हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती आली आहे. या बाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाRed Fortलाल किल्लाterroristदहशतवादीMumbaiमुंबईNew Delhiनवी दिल्ली