शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नाव बदलून विवाहितेला जाळ्यात अडकवलं; अपहरण करून ३ दिवस बलात्कार केला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 16:10 IST

मुलगी कुठेच न सापडल्याने नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन हरवल्याची तक्रार दाखल केली

उत्तर प्रदेशातील फतेपूरमध्ये एका विवाहित हिंदू मुलीची दुसऱ्या धर्माच्या तरुणाने फसवणूक, अपहरण आणि बलात्कार केल्याच्या आरोप लावण्यात आला आहे. नाव बदलून युवकानं प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप एका २१ वर्षीय युवतीने केलाय. त्यानंतर एके दिवशी भेटण्याच्या बहाण्याने बोलावून युवतीचं अपहरण करून तीन दिवस तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी कुठेच न सापडल्याने नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन हरवल्याची तक्रार दाखल केली. तातडीने कारवाई करत पोलिसांना मुलीचे अपहरण झाल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून मुलीला शोधून काढले, पोलिसांनी मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. त्याचवेळी मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.

पीडित तरुणीने आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी तिच्या मोबाईलवर एका तरुणाचा फोन आला होता. आपले नाव सोनू सिंग असे सांगताना या तरुणाने तो क्षत्रिय कुटुंबातील असल्याचे सांगितले. त्यानंतर ती त्याच्याशी फोनवर बोलू लागली. प्रेमात पडल्यानंतर १४ डिसेंबर रोजी प्रियकराने तिला विश्वासात घेऊन एका ठिकाणी भेटायला बोलावले. 

तेथून तो मुलीला एका घरात घेऊन गेला. त्या घरात गेल्यावर तिच्या प्रियकराचं नाव सोनू सिंग नसून सलीम असल्याचं मुलीला समजले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने याला विरोध केला असता सलीमने तिला ओलीस ठेवले आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडून लग्न करण्यास सांगितले. मुलीने नकार दिल्याने त्याने तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. दुसरीकडे, या प्रकरणाची भनक लागताच  हिंदुत्ववादी संघटनेचे काही लोकही पोलिस ठाण्यात पोहोचले. मुलीने आपल्यावर झालेल्या गुन्ह्याची कहाणी सर्वांसमोर सांगितली. हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांनी आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली.

युवती आधीच विवाहितपोलिसांनी सांगितले की, पीडितेचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला दोन वर्षांचा मुलगाही आहे.पण सासरच्या छळाला कंटाळून ती माहेरी राहत होती. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी सलीमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं पोलीस अधिकारी लालौली रवींद्र श्रीवास्तव यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी