शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चंद्रपूरच्या मद्यतस्करांची टोळी जेरबंद : विदेशी मद्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:58 IST

विदेशी दारूची मोठी खेप घेऊन चंद्रपूरकडे निघालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यतस्करांची टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री जेरबंद केली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशी दारूची मोठी खेप घेऊन चंद्रपूरकडे निघालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यतस्करांची टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री जेरबंद केली. या टोळीत सात मद्यतस्करांचा समावेश असून, पोलिसांनी त्यांच्याकडून विदेशी मद्याच्या तब्बल ८६३ बाटल्या जप्त केल्या.चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्यापासून नागपूर-चंद्रपुरातील मद्यतस्कर मिळेल त्या मार्गाने दारूची तस्करी करतात. त्यासाठी अल्पवयीन मुलांपासून तर महिला मजुरांपर्यंतचा मद्यतस्कर वापर करून करून घेतात. वेगवेगळ्या वाहनांचाही वापर करतात. खासगी वाहने, ट्रक, मेटॅडोरपासून तो छोट्या वाहनांपर्यंत सर्वच वाहनांचा तस्कर नागपुरातून चंद्रपुरात मद्य नेण्यासाठी उपयोग करतात. गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह ठिकठिकाणचे पोलीस वाहनांवर नजर ठेवून असल्याचे लक्षात आल्याने निर्ढावलेले आरोपी स्वत:च रेल्वेने मद्य नेतात. बुधवारी असेच काही मद्यतस्कर दारूची मोठी खेप चंद्रपुरात नेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. त्यावरून या पथकाने सीताबर्डी टेकडी गणेश मंदिर पुलाच्या खाली सापळा लावला. बुधवारी रात्री १०. ३० च्या सुमारास एका पाठोपाठ काहीजण संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग केला आणि तब्बल सात जणांना ताब्यात घेतले.त्यांच्या जवळच्या साहित्याची पोलिसांनी तपासणी केली असता पाचपन्नास नव्हे तर तब्बल ८६३ दारूच्या बाटल्या पोलिसांना आढळल्या. ज्यात ब्लेंडर प्राईड, आॅफिसर चॉईस, मॅकडॉल नंबर -१ सारख्या विदेशी ब्रॅण्डच्या मद्याचा समावेश आहे. पोलिसांनी हा दारूसाठा जप्त केला. आरोपींकडून पोलिसांनी ६ मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण २ लाख, ४ हजार, ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अशोक मेश्राम, एएसआय नागोराव इंगळे, हवलदार सुधाकर धंदर, कृपाशंकर शुक्ला, देवेंद्र चव्हाण, अजय रोडे, नायक बबन राऊत, आशिष क्षीरसागर यांनी ही कामगिरी बजावली.अटकेतील मद्यतस्करशाहरूख खान, हरीश ऊर्फ पिंटू श्रावण उईके, सूरज हरिप्रसाद सूर्यवंशी, भूषण दीपक पासफूलकर, अजय दीपक जाधव, सुनील रामजी मंडल आणि आशिष पुरुषोत्तम नारनवरे अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत. हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचे रहिवासी आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीSmugglingतस्करीArrestअटक